शिक्षकांना वरिष्ठ  वेतन श्रेणी व निवड श्रेणी लावा

0
25
* कास्ट्राईब शिक्षक संघटनेने डॉ. महेंद्र गजभिये शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्या समोर ठेवल्या मागण्या
गोंदिया- शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी लावण्यात यावी या  मागणी सह प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी दि. 13 डिसेंबर 2022 ला मा. ओमप्रकाश वासनिक अति. राज्य सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाध्यक्ष  कास्ट्राईब कर्मचारी महासंघ  जिल्हा गोंदिया यांच्या नेतृत्वात डॉ. महेंद्र गजभिये शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद गोंदिया यांचेकडे नियोजित बैठक संपन्न झाली. यावेळी अनिल चव्हाण उपशिक्षणाधिकारी, श्रीकांत जनबंधू प्रशासन अधिकारी  उपस्थित होते.
        जिल्हा परिषद प्राथ., माध्य. उच्च माध्यमिक शिक्षकांची बिंदू नामावली अद्यावत करण्यात यावी, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक (माध्य.) यांची बिंदू नामावली विषयी माहिती देण्यात यावी, जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी व  निवड श्रेणी पदोन्नती प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावे, जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक यांची संवर्ग निहाय रिक्त पदांची माहिती देण्यात यावी, खाजगी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाची पदे तातडीने भरण्यात यावी, विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्ती मिळणे संदर्भात कार्यवाही करण्यात यावी, नियमानुसार मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात यावी, सर्व शाळांचे दर महिन्याचे वेतन १ तारखेला करण्यात यावे, सेवानिवृत्तवेतन १ तारखेला करण्यात यावे, मृत/दिव्यांग खाजगी प्राथमिक शाळेतील  वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात यावी, जिल्हा परिषद शाळांमध्ये वाचनालय खोली उपलब्ध असावी, सर्व शाळांमध्ये शालेय दैनिक परिपाठात संविधान प्रास्ताविक व भारतीय संविधानाचे कलमांचे वाचन  करण्यात यावे, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती फाईल ६ महिन्यापूर्वी मंजूर करण्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी, सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उपदान, अंशराशिकरण, रजा रोखिकरण, भविष्य निर्वाह निधी, सर्व लाभ देण्यात यावे, पुढील दोन वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृत्त विषयक कागदपत्र तयार केली जावीत, ना देय/ ना चौकशी प्रमाणपत्र सेवानिवृत्ती च्या ८ महिन्यापूर्वीच देण्या संदर्भाने कार्यवाही करावी, शालेय गणवेश अनुदान शाळांना अविलंब देण्यात यावे, शिक्षकांचे वैद्यकीय बिले मंजुरी करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित दुसरा व तिसरा हफ्ता सेवानिवृत्त शिक्षक व कार्यरत शिक्षकांना देण्यात यावा, चर्चेची कार्योत्तर प्रत संघटनेस देण्यात यावी अशा विविध मागण्यांचा समावेश होता.
   प्रतिनिधीमंडळात  कास्ट्राईब शिक्षक संघटना म. राज्य चे अति सरचिटणीस तथा  कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, सिध्दार्थ भोतमांगे, विरेंद्र भोवते, रोशन गजभिये, किशोर डोंगरवार, दीक्षांत धारगावे, सौ. कलावती कोल्हटकर, राजेश गजभिये, यज्ञराज रामटेके, अनिल मेश्राम, अजित रामटेके, अजय शहारे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.