गोंदियातील मोर्च्यात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे:- संतोष तोमर

0
43

गोंदिया,दि.26ः राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा चतुर्थ श्रेणी ड गट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष  भाऊसाहेब पठाण यांचेवर मंत्रालयात माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेध नोंदवण्यासाठी उद्या मंगळवारला(दि.27) लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने गोंदियात मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार सारख्या मोठ्या नेत्याने चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष  भाऊसाहेब पठाण यांचेवर हल्ला करणे निषेधार्थ आहे. असे राजकीय नेते संघटना पदाधिकाऱ्यांवर हल्ले करीत असतील तर हे कदापी खपवून घेतले जाणार नाही. वर्ग चार कर्मचारी वर्गाचे नेतृत्व करणाऱ्या भाऊसाहेब पठाण यांचे वरिल भ्याड हल्ल्याचा गोंदिया जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ गोंदिया तसेच गोंदिया जिल्हा समन्वय समिती द्वारे जाहीर निषेध करण्यात येत असुन दि.27/12/2022 रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचेवर 353 अंतर्गत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकरी गोंदिया मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे.मध्यवर्ती संघटना जिल्हा समन्वय समितीचे प्रतिनिधि यांनी व सर्व कर्मचारी वर्गाने या मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन लिपिक वर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तोमर यांनी केले.