त्या पीडित कुटुंबाला सानुग्रह अनुदान वाटप

0
15

तिरोडा-तालुक्यातील बेलाटी बु. येथील दीपक चौधरी यांचा १४ मे २0२२ रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. चौधरी कुटूंबाची परिस्थिती खुप हालाकीची होती. त्यामुळे त्यांना सानुग्रह अनुदान राशी जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडून मिळावी, यासाठी जि.प.सदस्य किरण पारधी यांनी सतत प्रयत्न केले. अखेर त्या पिडीत कुटूंबाला सानुग्रह अनुदानापोटी २0 हजाराची मदत करण्यात आली आहे.
सर्पदंशामुळे दीपक चौधरी याचा मृत्यू झाला. घरचा कमावता व्यक्ती गेल्या कुटूंब संकटात सापडले. याची माहिती होताच जि.प.सदस्य किरण पारधी यांनी पिडीत कुटूंबाची भेट घेत शासनाकडून मिळणारे सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्हा परिषदेकडे सतत पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून सानुग्रह अनुदानापोटी २0 हजार रूपयाची मदत करण्यात आली आहे. दीपक चौधरी यांच्या वारसदार रजनी दीपक चौधरी यांना त्यांचा घरी जाऊन २७ डिसेंबर रोजी २0000 रुपए सानुग्रह अनुदान राशी जि.प.सदस्य किरणभाऊ पारधी यांच्या हस्ते देण्यात आली. यायावेळी प.स.सदस्य पिंटूभाऊ चौधरी, सरपंच वासुभाऊ हरिणखेडे, दुगार्भाऊ सोनेवाणे, दीनानाथ चौधरी, संजुभाऊ पटले, उपस्थित होते.