पेढे वाटून साजरा केला महिला शिक्षण दिवस

0
16

नागपूर,दि.01– 175 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 1 जानेवारी 1848 ला राष्ट्रनिर्माता ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.आद्यशिक्षिका माता सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिका म्हणून सेवा दिली.चिकलफेक,दगडफेक ,शिव्याशाप सहन करून आपले आद्यकर्तव्य या महिला वर्गाला शिकवणे आहे हे जाणून सर्व अळथळ्यांना पार करत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.त्या दिनानिमित्ताने आज 1 जानेवारीला या महामानवांना अभिवादन करण्यासाठी कॉटन मार्केट चौकातील पुतळ्यांना माल्यार्पण करुन सर्वांना पेढे वाटून आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.यावेळी उमेश कोरारम,दीनानाथ वाघमारे,मुकुंद अडेवार,धीरज भिषिकर,कुलदीप सोनकुसरे, पियुष आकरे,कृताल आकरे,प्रतीक बावनकर,यजुर्वेद सेलोकर,आणि इतर मार्केट परिसरातील दुकानदार बंधू उपस्थित होते.
गोंदियातही महामानवांना अभिवादन
गोंदिया-175 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 1 जानेवारी 1848 ला राष्ट्रनिर्माता ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.आद्यशिक्षिका माता सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिका म्हणून सेवा दिली.चिकलफेक,दगडफेक ,शिव्याशाप सहन करून आपले आद्यकर्तव्य या महिला वर्गाला शिकवणे आहे हे जाणून सर्व अळथळ्यांना पार करत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.त्या दिनानिमित्ताने आज 1 जानेवारीला या महामानवांना येथील ओबीसी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.यावेळी ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे,डाॅ.रुपसेन बघेले, ओबीसी संघर्ष समितीचे महासचिव शिशिर कटरे,कोषाध्यक्ष कैलास भेलावे,प्रसिद्दीप्रमुख महेंद्र बिसेन, ओबीसी सेवा संघाचे पी.डी.चव्हाण,डाॅ.प्रा.संजीव रहागंडाले,भारतीय पिछडा शोषित संघटनेचे अध्यक्ष प्रेमलाल गायधने,प्रमोद भोयर,पवार प्रगतीशिल मंचचे अध्यक्ष एड.पी.सी.चव्हाण,भागचंद रहागंडाले,गोंदिया खादी ग्रामोद्योगचे सचिव राजकुमार(पप्पू)पटले