सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त गरजु मुलांना लेखन साहित्य वाटप व प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे सत्कार

0
20

गोंदिया,दि.06ः येथील साईमंगलम कॉलनी विजयनगर महिला द्वारा आयोजित सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक समाजसेविका प्रा.डाॅ. सविताताई बेदरकर समाजसेविका, अपअभियंता शिखा पिपलेवार,माजी नगरसेविका विमलताई मानकर यांनी सर्वांना महिला सशक्तीकरण,जातीभेद निर्मूलन,शिक्षण सर्वात मोठे शस्त्र आहे.स्त्री पुरुष समानता, सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी कठीण परिस्थितीतुन सामोरे जाऊन महिलांना शिक्षणाची संधी निर्माण करून दिली,या विषयी संपूर्ण मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी कॉलोनीतील महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषण,नाटक,नृत्य, समूहगीत,कविता वाचन केले.लहान मुलींनी सावित्रीबाई फुले ची वेशभूषा परिधान करून भाषण व कविता गायन केले.
24 गरजू विद्यार्थ्यांना महिलांच्या वतीने लेखन साहित्य शिखा पिपलेवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावर्षी नवोदय विद्यालय नवेगावबांध करीता निवड झालेले नमन अमित घावडे, अवनी शेंडे व एमबीबीएसला आर्या रहांगडाले यांची निवड झाल्याने या सर्वांचा सविताताई बेदरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.संध्या रेला होत्या.तर उद्घाटक म्हणून माजी नगरसेविका विमलताई मानकर,मार्गदर्शक  म्हणून सविताताई बेदरकर, शिखा पिपलेवार प्रमुख अतिथी शोभा प्रसाद, किरण हत्तीमारे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितु डहाट दुर्गे यांनी केले.प्रास्ताविक पूनम भारती व आभार प्रदर्शन चंदना प्रधान यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंती यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सारिका टेम्भुर्णे,वैशाली चौरे, पूनम भारती, साक्षी घावडे, मीना चुलपार, लालना नंदागवळी,रुपाली शेंडे, रागिनी नंदेश्वर, निलम रंगारी, स्फुर्ती धोपेकर,आशा टेंभुर्णीकर, मधु कुरसुंगे, ममता मेश्राम,मीना मेश्राम,अनिता वासनिक, प्रिया सोनेवाने, जोत्स्ना बन्सोड, मनीषा नागदेवे, स्वाती भोयर, निशा कुरसुंगे, प्रतिमा मिंज, दिनेश्वरी वाढई, पद्मा भवरे, ममता डोलारे, छाया दाणी, सुरेखा लोहारे, उत्कर्षा गडपायले, शुभांगी गणवीर, सरिता ढेकवार, रोशनी उके, मेघा आहाके,किरण बोरकर, आरती निरंजन डहाट, कविता यादव, सोनम लाडे,नेहा गुप्ता, उज्ज्वला पाटील, प्रीती भालाधारे,शिल्पा जाधव,किरण हत्तीमारे, संध्या रेला, शोभा प्रसाद, चंदना प्रधान,नितु डहाट,व साईमंगलम कॉलोनीतील महिला सदस्यांनी सहकार्य केले.