जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या निवडणुकीत आशिष प्र. रामटेके पॅनलची निर्विरोध निवड.
गोंदिया,दि.12- भंडारा-गोंदिया जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पत संस्थेची सन 2022 ते 2027 या कालावधी करिताची संचालक पदाच्या निवडणुक पार पडली.या निवडणुकीत आशिष प्र.रामटेके यांच्या संपूर्ण पॅनलची बिनविरोध निवड झाली आहे.तर संस्थेच्या अध्यक्षपदी राकेशकुमार डोंगरे यांची तर सचिव पदावर जगदिश जांभुळकर यांची बिनविरोध निवड संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली.
संस्थेच्या संचालकमंडळामध्ये आशिष प्र. रामटेके अर्जुनी मोरगाव,राकेशकुमार डोंगरे गोंदिया, कुमारी सारिका बंन्सोड गोंदिया,आशा बहेकार आमगाव,जगदीश जांभुळकर सडक अर्जुनी,संजय नान्हे देवरी,अजितकुमार भोवते तिरोडा, यांची बिनविरोध निवड झालेली असून 11 जानेवारी, 2023 रोजी भंडारा येथे झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये राकेशकुमार डोंगरे यांची पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तर जगदीश जांभुळकर यांची सचिव पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.सर्व संबंधितांना महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा गोंदिया तसेच जिल्हा भंडारा यांच्या वतीने पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.





