24.2 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमीत्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा   

प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमीत्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा   

0
25

गोंदिया,दि.14 : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन कार्यक्रम साजरा करण्याच्या दृष्टीने  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पुर्व नियोजन आढावा घेतला.

        सभेला निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

        जिल्हाधिकारी श्री. गोतमारे पुढे म्हणाले, प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम येथील कारंजा पोलीस कवायत मैदानावर होणार असून नागरिकांनी कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले.

        कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर पेन्डॉल तयार करणे, नागरिकांना पेन्डॉलध्ये बसण्यासाठी 500 खुर्च्या लावण्यात यावे, विद्युत सेवा अखंडीत सुरु राहील अशी व्यवस्था करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, ॲम्बुलन्सची व्यवस्था करणे, वाहतुक व्यवस्थेबाबत बसेसची व्यवस्था करणे, ज्या विभागाला कामाची जबाबदारी दिलेली आहे त्यांनी आपली कामे जबाबदारीने पार पाडावे. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इतर विभागाच्या समन्वयाने काम करणे. कार्यक्रमा प्रसंगी एन.सी.सी. व स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात यावा. तसेच उत्कृष्ट कामे केल्याबद्दल ज्या विभागाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करायचे असतील त्या विभागानी 17 जानेवारी 2023 पर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालयात यादी सादर करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.