मकरसंक्रातीला पर्यटकांच्या गर्दीने फुलले नवेगावबांधचे राष्ट्रीय उद्यान

0
16
वाढदिवसाच्या शुभेच्छा

हिलटॉप गार्डन व ग्रीनपार्क उपहार गृह आकर्षणाचे केंद्र

गोंदिया -जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एकमेव निसर्ग सौंदर्याने नटलेला राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध  आपल्या निसर्ग सौंदर्याने पुन्हा एकदा पर्यटकांना खुनवतो आहे. 14,15 जानेवारीला मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर पर्यटकांनी राष्ट्रीय उद्यान गजबजून गेले होते. हिलटॉप गार्डन ग्रीनपार्क उपहार गृह व ठिकठिकाणी असलेले आकर्षक बालोद्यान तथा बोटींगची व्यवस्था व जंगल सफारी यामुळे या राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त झाल्याचा अनुभव  पर्यटकांनी अनुभवला.

एकेकाळी निसर्ग सौंदर्याची पंढरी म्हणून नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाची ओळख होती. पशु पक्षी, बागबगीचे, चौपाटी व नैसर्गिक सौंदर्याची मुक्त उधळण असलेल्या नवेगांवबांध राष्ट्रीय उद्यान अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उदासिनतेमुळे भकास झाला होता. सध्या या राष्ट्रीय उद्यानाला नवेगावबांध फाऊंडेशन व ईंजी.सुनिल तरोणे यांच्या अथक प्रयत्नाने गतवैभव प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे. मागील डिसेंबर महिन्यात स्पेन व ऑस्ट्रेलिया देशातील पर्यटकांनी भेट दिली असून ग्रीनपार्क उपहार गृहातील जेवनाचा आनंद घेतल्याची माहिती एस.के. गृपचे सुनिल तरोणे यांनी दिली.

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान

तत्कालीन वन अधिकारी व निसर्ग साहित्यिक मारुती चिंत्तमपल्ली यांनी मागील काळात या राष्ट्रीय उद्यानाचा चौफेर विकास करून सौंदर्य मिळवून दिले होते. चिंतमपल्ली साहेबांनंतर या निसर्ग स्थळावर मनापासून प्रेम करणारे अधिकारी व लोकप्रतिनिधी न मिळाल्याने पर्यटकांचा लोंढा थांबला होता. या राष्ट्रीय उद्यानाचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान बचाव कृती समिती, नवेगावबांध फाउंडेशनच्या वतीने अनेक पद्धतीने संघर्ष करण्यात आला. माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री व तत्कालीन पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांचे भरीव सहकार्याने नवेगावबांध फाउंडेशन व तरोणे बंधूंच्या सकारात्मक भूमिकेमुळे या राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यातच हिलटॉप गार्डनची निर्मिती झाली. इंजि. सुनील तरोणे यांनी आपल्या सकारात्मक गुणांची कल्पना साकारून आज हिलटॉप गार्डन तयार करून या उद्यानाच्या सौंदर्यात भर टाकली.

सुनील तरोणे एवढ्यावरच थांबले नाही तर पर्यटकांचे पाय या उद्यानाकडे वळावे म्हणून 40 वर्षापासून भंगारात पडलेल्या ग्रीन पार्क उपहारगृह एस के ग्रुपला चालविण्याचे कंत्राट वन विभागाकडून घेतले व उपहारगृहाच्या जिर्णोद्धाराचे काम सुनील तरोणे यांनी सुरू केले. आज हा उपहारगृह नववधूसारखा उभा असून खाण्यापिण्याच्या मोठ्यापासून तर गरिबापर्यंत सोयी या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. तर छोटेखाणी कार्यक्रम करण्याची सुद्धा सोयीसुविधा उपलब्ध करून छोट्या बालकांसाठी आकर्षक असे खेळण्याचे सामान व बालोद्यान सुरू करून अति प्रसन्न व स्वच्छ वातावरणाची निर्मिती केल्याने पर्यटकांचे पाय आपसूकच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाकडे वळू लागले आहेत.

या उपहारगृहाच्या उद्घाटनाप्रसंगी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पवन जेब यांनी या राष्ट्रीय उद्यानाचा चेहरामोहरा येत्या एक-दोन वर्षात बदलविण्याचा मानस व्यक्त केला आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाला निसर्गाने खूप काही दिले आहे. उद्यानात माधवजरी, राणी डोह, कामझरी, टेलनझरी, अंगेझरी, शृंगार बोडी असे निशिर्गनिर्मित देखावे सध्या अखेरच्या घटका मोजत आहेत. सन 2008 नऊ मध्ये एक खाजगी कंट्रक्शन कंपनीने पर्यटन संकुल परिसरात राॅक गार्डन व कॉन्फरन्स हाल तब्बल दोन कोटी खर्च करून घेतले. मात्र आजपर्यंत त्याचे लोकार्पण झाले नाही व राॅक गार्डन सुद्धा सध्या तरी दिसेनासा झाला आहे.

नवेगाव फाउंडेशन तर्फे लोकवर्गणी व माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या सहकार्याने तसेच सुनील तरोणे बंधूंच्या अथक परिश्रमाने एकमेव हिलटाॅप गार्डन नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचे आकर्षण ठरत आहे. सध्या सुनील तरोणे बंधूंच्या परिश्रमाने व नवेगावबांध फाउंडेशनच्या वतीने हिल टॉप गार्डन, ग्रीन पार्क उपहारगृह, ठिकठिकाणी असलेले बालोद्यान तथा तलावात बोटिंगचा आनंद व जंगल सफारी यामुळे या राष्ट्रीय उद्यानाला गत वैभव प्राप्त झाल्याचा अनुभव आज पर्यटकांना येत आहे.

या पर्यटन संकुलात ज्या स्थळाचा विकास करायचा आहे त्यात थायलंडच्या धर्तीवर वन्यजीव संरक्षण विभागाच्या अनुक्रमांक एक ते पाच मधील प्राणीसंग्रहालय उभारणे, शेगावच्या धरतीवर प्रवेशद्वार, संकुल परिसरात दुतर्फा शोभिवंत वृक्षाची लागवड, क्रीडांगण तयार करणे, जलतरण तलाव, संजय कुटी परिसरात तीन किलोमीटरची मिनी ट्रेन तयार करणे, मनोहर उद्यान, वैभव गार्डन, हॉलिडे होम ्स अशा अनेक पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी आम्ही नवेगावबांध फाउंडेशन व एस के ग्रुपच्या वतीने सदैव प्रयत्नत असून या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा आमचा मानस असल्याचे इंजिनीयर सुनील तरोणे यांचे म्हणने आहे.

14 व 15 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या पर्वावर मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांची सुलभ व्यवस्था व्हावी, परिसर स्वच्छ रहावे व पार्किंगच्या व्यवस्थेसाठी नवेगावबांध फाउंडेशनचे रामदास बोरकर, विजय डोये व त्यांची चमू तथा नवनिर्वाचीत सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य व वन समिती हे विशेष परिश्रम घेतले.