पंचायत समिती गोंदिया येथील कनिष्ठ अभियंता कु.दुबेंच्या कार्यक्षेत्रातील विकासकामे वार्यावर

0
35

गोंदिया- येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता कु.नितेश दुबेंच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अनेक विकास कामांची गती मंदावल्याने विकासकामे वार्यावर दिसून येत आहेत.त्यांच्या टालमटोल व अडथळे निर्माण करण्याच्या भूमिकेमुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिव एकूणच, त्यांच्या जि.प. क्षेत्रातील ग्रामपंचायती विकास कामाकरीता त्रस्त झाले आहेत. कनिष्ठ अभीयंता कु. नितेश दुबे ग्रामपंचायतीच्या विकास कामामध्ये नाना प्रकारच्या तांत्रीक अडचणी निर्माण करुन कामांमध्ये अडचणी निर्माण करीत असल्याचे माजी उपसरंपच रवी तराेणे यानी म्हटले आहे. ग्रामपंचायतीचे विकासकामे करण्याच्या आधी प्रत्येक कामांचा अंदाजपत्रक तयार करण्यात येतो. कामांचा अंदाजपत्रक अभीयंत्यांच्या हातून तयार करण्यात येतो. त्या अंदाजपत्रकावर अभियंत्यांची स्वाक्षरी शुध्दा असते. तरीपण, कनिष्ठ अभियंता कु. नितेश दुबे च्या जि.प. क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अनेक योजनांचे विकासकामे खोळंबली आहेत. ज्या दिवसापासून कनिष्ठ अभियंता म्हणून पंचायत समिती, गोंदिया येथे चार्ज घेतला, त्या दिवसापासून त्यांना वाटून दिलेल्या जि.प. क्षेत्रातील ग्रामपंचायती हवालदिल झाल्या आहेत. गावातील विकास कामे होत नसल्यामूळे ग्राम पंचायतीचे सरपंच / उपसरपंच / सदस्य व सचिवांना जनतेच्या त्रासांना सामोरे जावे लागते. याबाबत कितीदातरी सरपंच / सचिवांनी कनिष्ठ अभियंता नितेश दुबेला गावकऱ्यांचा तक्रारीबाबत कळविले. तरीपण, विकासकामांच्या गतींना थांबविण्यात मॅडमचा नंबर एकच लागतो. अंदाजपत्रकाप्रमाणे कामे झाल्यावरशुध्दा मोजमाप केल्याच्यानंतर दोन-दोन महिने कामाची एम.बी., सि.सी., करुन देत नाहीत. गोंदिया पंचायत समितीमध्ये नेहमी मॅडमच्या सोबत कोणत्या ना कोणत्या सरपंचाचा वाद-विवाद होणे हि दिनचर्या झाली आहे. याबाबत अनेकदा तक्रार प्राप्त झाली आली आहे. तरीपण, मॅडमची कार्यशैलीवर काहीच फरक पडला नाही. पूर्ण.क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या विकासकामाचे आजही बेहाल झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे कु. नितेश दुबे यांनी केलेले संपूर्ण केलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि गोंदिया पंचायत समिती चा चार्ज काडून दुसऱ्या अभियंत्याला देण्यात यावे अशी मागणी इर्रीचे माजी उपसरपंच रवि तरोणे यांनी केली आहे.