भजेपारच्या शिपाई सुभाषची गणतंत्र दिवस परेडसाठी निवड

0
24

सालेकसा,दि.21- तालुक्यातील भजेपार येथील शिपाई सुभाष राजकुमार रहिलेची दिल्ली येथील गणतंत्र दिवस परेडसाठी निवड झाली आहे. सुभाष एका गरीब कुटुंबातुन आहे.सुभाषच्या कुटुंबात आईवडील मंगला व राजकुमार, भाऊ डोमेश्वर, बहीण लक्ष्मी आहे. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे काका हंसराज रहिले यांच्याकडे राहून सुभाषने शिक्षण घेतले.सुभाषला भारतीय सैन्य दलात भरती होण्याची इच्छा होती.12 वीत शिकत असताना सुभाष भारतीय सैन्य दलात सन 2019 मध्ये शिपाई म्हणून नियुक्त झाला.तो सध्या लेह लद्दाख येथील 10 मॅक (20 मराठा) मध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहे.सुभाषचे सेवेतील कार्य, कर्तुत्व व गुणवत्तेमुळे अहमदनगर रेजिमेंट मधून आर.डी. परेड करिता त्याची निवड करण्यात आली.आता सुभाष येत्या 26 जानेवारी रोजी दिल्ली येथील आयोजित आर.डी.परेडमध्ये जिल्हा अहमदनगर रेजिमेंटचे प्रतिनिधित्व करणार आहे. लहानशा खेडेगावातील पताका इंडियन आर्मी सेवेतून दिल्लीपर्यंत नेल्याबद्दल सुभाषचे सर्वत्र कौतुक होत आहे.