मुंडीपार जि.प.शाळेत दप्तर मुक्त शाळा उपक्रम

0
30

सहाय्यक गटविकास अधिकाऱी , विस्तार अधिकारी यांची भेट
गोरेगांव:- तालुक्याती जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपार येथे दप्तर मुक्त शनिवार या उपक्रमांतर्गत आज(दि.21) विविध कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांचे नृत्य, गीत गायन, लेझीम इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. लेझीम या उपक्रमात झाडे लावा- झाडे जगवा, बेटी बचाओ- बेटी पढा़ओ, संयम पाळा, एड्स टाळा अशी जनजागृती प्रात्यक्षिके करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी गौतम,विस्तार अधिकारी पंचायत टि.डी.बिसेन,ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर यांनी भेट दिली.” दप्तर मुक्त शनिवार सर्व शाळांनी आपापल्या स्तरावर राबवावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न करावे” असे प्रतिपादन सहाय्यक गटविकास अधिकारी गौतम यांनी केले. तर विस्तार अधिकारी(पंचायत)टि.डी.बिसेन यांनी शाळेची शिस्त, विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या उपक्रमातील सहभाग, शालेय परिसर, गुणवत्ता विकास इत्यादी बाबतीत शाळेची होत असलेली प्रगती याबाबत प्रशंशा करीत असतांना समाधान व्यक्त केले. शाळेच्या विकासासाठी वेळोवेळी आम्ही सहकार्य करू असेही आश्वासन दिले.
“शालेय विद्यार्थी हे आमचे दैवत आहेत. त्यांच्या प्रगतीचा आम्ही ध्यास घेतलेला असून गुणवत्ता विकास , शालेय स्वयंशिस्त , दप्तर मुक्त गेल्या मागच्या शनिवार मध्ये आपल्या घरातुन काही विविधप्रकारचे खाद्य पदार्थ तयार करुन शाळेत स्टॉल लावले व ते स्वत:विक्री करुन व्यवसाय कसा करावा याचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला.असे शाळेचे मुख्याध्यापक एस.एम.काठेवार यांनी सांगितले.
त्यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजू सिंदीमेश्राम मेश्राम व समितीचे सदस्य, गावातील पालक यांनी उपस्थित राहून दप्तरमुक्त शाळेअंतर्गत कार्यक्रमाचा आनंद घेतला.