अर्जुनी मोर पंचायत समिती कार्यालयातील रोहयो संपूर्ण कामे ठप्प

0
8

अर्जुनी मोर-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ,कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक ,क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी टप्पेनिहाय आंदोलन सुरू करण्यात आले होते.18 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय संप करण्यात आला.अर्जुनी मोर पंचायत समितीमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याने पंचायत समितीतील सर्व कामे ठप्प पडलेली होती. टप्पेनिहाय आंदोलनासंबंधाने संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना यापूर्वीच निवेदन दिलेत.त्यांनी दिलेल्या निवेदनात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत मागील 10 ते 12 वर्षापासून प्रामाणिकपणे अखंडित कामे करीत आहेत. वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेली कामे व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असून कामे वेळेवर पूर्ण करीत आहेत. कोविड 19 या महामारीच्या काळात सुद्धा नियमित कार्यरत राहून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोणत्याही शासकीय सुविधा नसताना सुद्धा रोजगार हमी योजना अंतर्गत योजनांचे कामे करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिले.असे असताना सुद्धा मागील तीन ते चार वर्षापासून कंत्राटी कर्मचार्यांना कोणतेही मानधन वाढ झालेली नाही. मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे. योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी. ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या मध्यप्रदेश शासनाच्या प्रमाणे वयाच्या 62 व्या वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी.आदी मागण्याकरीता 25 जानेवारीपासून मागण्या पूर्ण होईपर्यंत असहकार आंदोलन करून लेखणी आढावा सभा अहवाल ऑनलाइन कामे बंद केल्याने कामे ठप्प पडली आहेत.