२९ पोलिस अधिकारी, अंमलदारांना पोलिस शौर्य पदक जाहीर

0
6

गडचिरोली-पोलिस दलात कार्यरत असताना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधेला गडचिरोली पोलिस दलातील २९ पोलिस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. गडचिरोली पोलिस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.
पोलिस शौर्य पदक अधिकारी व अंमलदारामध्ये मनीष कलवानिया पोलिस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण, पोलिस निरीक्षक संदीप पुंजा मंडलिक, पोलिस निरीक्षक अमोल नानासाहेब फडतरे, सपोनि राहूल बाळासो नामदे, सुनील बिश्‍वास बागल, योगिराज रामदास जाधव, पोलिस उपनिरीक्षक सदाशिव नामदेव देशमुखे, प्रेमकुमार लहू दांडेकर, राहुल विठ्ठल आव्हाड, सफायक फौजदार देवा कोत्तुजी कपेवासे, पोहवा देवेंद्र पुरुषात्तम आत्राम, देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम (प्रथम बीएआर ते पीएमजी), राजेंद्र अंताराम मडावी, नांगसू पंजामी उसेंडी (प्रथम बीएआर ते पीएमजी), सुभाष भजनदराव पदा, पोअं रामा मैनू कोवाची, प्रदीपक विनायक भसारकर, दिनेश पांडुरंग गावडे, एकनाथ बारीकराव सिडाम, प्रकाश श्रीरंग नरोटे, शंकर दसरू पुंगाटी, गणेश शंकर डोहे, सुधाकर नानू कोवाची, नंदेश्‍वर सोमा मडावी, भाऊजी रघू मडावी, शिवाजी मोडू उसेंडी, गंगाधर केरबा कराड, महेश पोचम मादेश, स्वन्नील केसरी पदा यांचा समावेश आहे.
सदर पोलिस अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनिय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलिस दलाचे वतीने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतूक करीत पुढील सेवेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.