दवडीपार ग्रामपंचायत येथे सरपंचानी केले ध्वजारोहण

0
19

गोरेगाव,दि.27ः तालुक्यातील दवडीपार येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.येथील ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच बुगलाल कटरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपसरपंच साहेबलाल,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व सर्व आजी- माजी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.विविध सेवा सहकारी कार्यकारी संस्था दवडीपार येथे संस्थेचे अध्यक्ष देवचंद बिसेन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रभुषण चौधरी यांच्यासह संचालक उपस्थित होते.