महिला सुसंस्कृत आणि शिक्षित झाली तरच त्या समाजाची प्रगति होते : सौ.अश्विनी रविकुमार पटले जिल्हा परिषद सदस्य

0
36

गोंदिया–* महिला सुसंस्कृत आणि शिक्षित झाली तरच समाजाची प्रगति होते. पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावुन काम करीत असते . अशा महिलांना धिर देण्याचे काम पुरुषांचे असते राष्ट्रमाता , राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, राणी दुर्गावती या महान विभुती यांचे जिवन खडतर होते. त्या डगमगल्या नाहीत अन्याय अत्याचारा विरोधात लढण्यासाठी अग्रेसर होत्या. त्यामुळे नविन पिढीने यांचे चरित्र वाचले पाहीजे असे मार्ग दर्शन सौ.अश्विनी रविकुमार पटले जिल्हा परिषद सदस्या यांनी व्यक्त केले.
गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगनावर एकोडी ग्राम पंचायत कडून आयोजित हळदी कुंकू कार्यकामात ते बोलत होत्या. यावेळी कार्यकामाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य सौ माधुरीताई रहांगडाले तर प्रमुख पाहुणे म्हणून इंजीनियर स्नेहा गडपायले , माजी पंचायत समिति सभापती सौ.सरिता रमेश अंबुले, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.रेखाताई चौधरी, एकोडी सरपंच सौ.शालुताई मुन्नालाल चौधरी, सौ.मीनाक्षीताई राजेशजी कटरे
सहेसपुर सरपंच सौ. वंदनाताई हितेशकुमार पताहे, उपसरपंच सौ.वर्षाताई अंबुले, ग्राम पंचायत सदस्य सौ.संगीताताई अशोक रिणाईत, सौ.शबनमताई खालिक पठाण, सौ.वहिदाताई शेख, सौ.संगीताताई वरठी, सौ.रंजुताई पटले,सौ मनिषताई नामदेव बिसेन इत्यादि उपस्थित होते. या दरम्यान हळदी कुंकू यानिमित्ताने महिलांनी उखाणे , गीत गायन करुण कार्यक्रमात रंगत आणली महिलांना वाणाच्या स्वरुपाण सिपर भेट वस्तु देण्यात आल्या कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका आर. एम. उईके यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षिका ए. सी. हरिणखेडे यांनी मानले.