यात्रे दरम्यान गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित करा – कर्नल विश्वास सुपनेकर   

0
22
  • कचारगड यात्रे दरम्यान गर्दी व्यवस्थापन कार्यशाळा

       गोंदिया, दि.30 : कचारगड यात्रेला विविध राज्यातून भाविक येत असतात. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे अशा सूचना सेवानिवृत्त कर्नल विश्वास सुपनेकर यांनी दिल्या.कचारगड-धनेगाव येथील सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. अर्जुनी/मोर उपविभागीय अधिकारी विजयकुमार सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा पुरवठा अधिकारी लिना फलके यावेळी मंचावर उपस्थित होते.

         यात्रे दरम्यान अचानकपणे कुठलीही आपत्ती येऊ शकते. त्यामुळे अग्नीशमन दल, आरोग्य विभाग, औषध व अन्न पुरवठा, विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभाग व पोलीस विभागानी सतर्क राहून काम करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चार भागात विभागनी करुन प्रत्येकाचे नोडल अधिकारी नेमून गर्दीचे व्यवस्थापन केले तर यात्रा सुलभरित्या पार पाडण्यास मदत होते. यात्रे दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आहे. Event काय आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. मुक्काम करणाऱ्या भाविकांची योग्य ती व्यवस्था करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

        भाविकांना योग्य त्या सोई-सुविधा पुरविण्यात याव्यात. लाईटची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक असून त्याला बॅकअप (जनरेटर) असणे गरजेचे आहे. पोलीस विभागाने Recovery टीम ठेवण्यात यावी व त्याबाबत नियोजन करण्यात यावे. दुकानदारांची  नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. यात्रे दरम्यान नागरिकांना भोजनदान दिले जाते, त्यामुळे अन्नाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेपूर औषधी साठा उपलब्ध करुन ठेवावा. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय व्यवस्था तसेच अग्नीशमलन दलची व्यवस्था करण्यात यावी. यात्रे दरम्यान Unity of Command चा वापर करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.    

       ज्या ठिकाणी धोकादायक रस्ता आहे त्या ठिणाणी बॅरिकेटींगची व्यवस्था करण्यात यावी. पार्कींगची व्यवस्था सुनियोजित करणे गरजेचे आहे. ट्राफीकला डायरेक्शन असणे आवश्यक आहे. अचानकपणे एखादी दुर्घटना घडली तर Resources ठेवण्यात यावे. येण्या-जाण्याची ट्राफीक कंट्रोल करणे आवश्यक आहे. सगळ्या दुकानदारांना demonstration देणे गरजेचे आहे. यात्रा सुलभरित्या पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. Crowd managmet व Crowd control याबाबत विचार करण्यात यावा. यात्रे दरम्यान कुठल्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहावे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवावा. ज्या विभागाला जबाबदारी दिलेली आहे त्यांनी आपली जबाबदारी अचुकपणे पार पाडावी. प्रत्येक विभागाने आपसात समन्वय ठेवणे गरजेचे आहे, असे कर्नल सुपनेकर यांनी यावेळी सांगितले. 

      सालेकसा तालुका मुख्यालयापासून 6 कि.मी. अंतरावर हाजरा फॉल निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून जवळच आदिवासी कुलदैवतेचे श्रध्दास्थान म्हणून कचारगड देवस्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी फेब्रुवारी माघ पौणिमेनिमीत्त पाच दिवसाच्या यात्रेचे आयोजन व आदिवासी महासंमेलना निमीत्त सदर यात्रेस मोठ्या प्रमाणात झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व इतर राज्यातून भाविक येत असतात. यावर्षी 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत कचारगड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. असे यावेळी सांगण्यात आले.

       कार्यशाळेस तहसिलदार (अर्जुनी/मोर) विनोद मेश्राम, अपर तहसिलदार (गोंदिया) अनिल खडतकर, तहसिलदार (सालेकसा) डी.एम.मेश्राम, ठाणेदार जनार्दन हेगडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय बिसेन यांचेसह जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच कचारगड देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले.