स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवाडा मोहिम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023

0
11

हत्तीरोग एक दिवसीय सामुदायीक औषधोपचार मोहिम

जनजागृती दौड व प्रभातफेरी चे आयोजन

भंडारा, दि.03: 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवडयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असुन त्याचाच एक भाग म्हणुन आज भंडारा शहरातील नगर परिषद गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जनजागृती दौड व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

            स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा साजरा करतांना कुष्ठरोगाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करुन समाजात कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याबाबत विदयार्थ्यांनी कुष्ठरोग व हत्तीरोगाचे निर्मुलन करण्याकरीता पुढाकार घेण्याबाबत आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर यांनी केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम यांनी कुष्ठरोगाबाबत लवकर निदान व संपूर्ण उपचार याबाबत मार्गदर्शन केले, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ.अदिती त्याडी यांनी भंडारा तालुक्यातंर्गत ग्रामिण व भंडारा शहरात राबविण्यात येण्याऱ्या एक दिवसीय सामुदायीक औषधोपचार देण्यात येणार असुन हत्तीरोगाला आळा घालण्याकरीता प्रतिबंधात्मक उपचार म्हणुन वयोगटानुसार देण्यात येणाऱ्या औषध (गोळया) खाऊ घालण्यात येणार आहेत, तरी आपणापर्यंत येणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा, स्वयंसेवक यांना सहकार्य करावे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.महेंद्र धनविजय, मुख्याध्यापक ओ.एन.नागोशे, क्रिडा शिक्षक विवेक उजवणे उपस्थित होते.

            जनजागृती दौड मध्ये सहभागी विदयार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार व प्रशास्ती पत्र देण्यात आले. सदर  कार्यक्रमाचे यशस्वीरित्या पारपाडण्याकरीता निरंजन पाखमोडे, लक्ष्मन सोनवाने, धर्मपाल ढबाले, गिता वऱ्हाडे, डी.सी.लांजेवार, किरपाने, तिलक सार्वे, प्रशांत भुरे, संचालन प्रविण बडवाईक यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक सुखराम निखाडे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विदयार्थी व कर्मचारी उपस्थित होते.