कचारगड येथे देवजत्रा व आदिवासी निवास भवनाचे आमदार कोरोटे यांच्या हस्ते भुमिपूजन.

0
7

सालेकसा,ता.०7: आदिवासी समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे पारीकुपार लिंगो व माँ काली कंकाली देवीच्या यात्रे निमित्य रविवार (ता.५ फेब्रुवारी) रोजी मांझी सरकार यांच्या वतीने आयोजीत देवजत्रा व आदिवासी निवास भवनाचे भुमिपूजन या क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आमदार कोरोटे यांनी उपस्थित माझी सरकार चे पदाधिकारी व सदस्यांन सह आदिवासी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी जि.प. सदस्य वंदना काळे, गीता लिल्हारे, छाया नागपूरे, छबू ऊके, सभापती प्रमिला गणवीर, उपसभापती संतोष बोहरे, पं.स. सदस्य रेखाई फुंडे, विणाई कटरे, कांग्रेसचे आमगांव तालुकाध्यक्ष संतोष बहेकार, जिल्हा महासचिव राजू काळे, सालेकसाचे शहराध्यक्ष निर्दोश साखरे, सामाजिक कार्यकर्ते राजू दोनोडे, महेश ऊके, रामेश्वंर शांमकुवर, हेमराज ढेकवार, माजी सरपंच ललीता ढेकवार, पिपरीयाचे सरपंच अनिल सयाम, तेजलाल पटले, भाऊलाल कटरे, उपसरपंच गुणाराम मेहर यांच्यासह विविध राज्यातून दर्शनार्थ आलेले आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.