33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ देवरीत संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी

देवरीत संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी

0
31

blank

देवरी,दि.७ (प्रतिनिधी)- संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती देवरी येथील विदर्भ तेली महासंघ शाखेच्या वतीने गेल्या शनिवारी  (दि.४) उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्थानिक शेडेपार रोड स्थित तेली समाजाच्या नवीन प्रस्तावीत इमारतीच्या जागेवर आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष भाष्कर धरमशहारे हे होते. प्रमुख अतिधी म्हणून तुमरस विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे हे उपस्थित होते. यावेळी मंचावर उपाध्यक्ष प्रभाकर निर्वाण, झामसिंग येरणे, अनिल येरणे,राजू चांदेवार, माया निर्वाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री वाघमारे म्हणाले की, समाजाला श्री संत जगनाडे महाराज यांच्या शिकवणीला अनुसरून समाजकार्यासाठी एकजुट होने गरजेचे आहे. आपला समाज एकजूट झाल्याशिवाय प्रगती करू शकणार नाही.
समाज जागरूक असणे ही काळाची गरज आहे.

तत्पूर्वी आमगाव रोडवरील समाज भवनातून बाइक रॅली काढण्यात आली होती. या शिवाय समाजाच्या वतीने 10वी 12वी नवोदय व इतर क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त मुला मुलींचा सत्कार करण्यात आला. प्रास्तावीक अॅड गंगभोईर यांनी केले आणि उपस्थितांचे आभार राजू चांदेवार यांनी मानले. या कार्यक्रमाला तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी अधेक्षिये भाषण अडवोकेक्ट गंगभोईर यांनी केले .

blank