कर्करोगाचे वेळीच निदान व उपचार झाल्यास कर्करोग समुळ नष्ट करता येतो- डॉ. कुसुमाकर घोरपडे

0
9

गोंदिया,दि.7 : वेळीच उपचार व निदान झाल्यास कर्करोग समुळपणे नष्ट करता येईल, त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या यावर्षीच्या संकल्पनेनुसार “क्लोज द केअर गॅप” म्हणजेच जिल्हा, राज्य तसेच देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत कर्करोग विषयावर निदान व उपचार पध्दती पोहचविण्यास शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी केले.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच रिलायंस कॅन्सर केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाहयरुग्ण विभागात रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, आंतरवासीता विद्यार्थी, नर्सेस व उपस्थित नागरिकांसाठी कॅन्सर या गंभीर आजारावर जनजागृतीपर माहितीसंवाद व शिक्षण कार्यक्रम अधिष्ठाता, डॉ. कुसुमाकर घोरपडे यांचे अध्यक्षतेत पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

          डॉ. प्रशांत तुरकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. मनोज तालापल्लीवार, विभागप्रमुख, पी.एस.एम., डॉ.संजय माहुले, उपवैद्यकीय अधीक्षक, रिलायंस कॅन्सर रुग्णालयाचे कर्करोग विशेषज्ञ डॉ.सौरभ मसराम, डॉ.सुलभ रहांगडाले, डॉ. अमित जोगदंडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. अभय आंबिलकर, डॉ. शिल्पा पटेरिया, डॉ. अमित धकाते, सुरेखा व्यँहाडकर व समस्त अधिकारी, नर्सिंग स्टाफ यावेळी उपस्थित होते.

          सदर कार्यक्रमात रिलायंस कॅन्सर रुग्णालयाचे कर्करोग विशेषज्ञ डॉ. सौरभ मसराम यांनी कॅन्सर या आजारावर सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. संजय माहुले, उपवैद्यकीय अधीक्षक यांनी कॅन्सर या आजारावर विविध वैद्यकीय व पॅथॉलॉजिकल चाचण्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व सद्या पॅथॉलॉजिकल चाचणीमध्ये चार गाठींच्या तपासणीमधुन दोन चाचण्यांचा अहवाल पॉझिटीव्ह येत असल्याचे सांगितले. यानंतर डॉ. मनोज तालापल्लीवार, विभागप्रमुख, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, समाजातुन धुम्रपान व व्यसनाधिनता कमी केली की, कॅन्सर रोग हा होणार नाही तसेच डॉ. प्रशांत तुरकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी कॅन्सर आजाराच्या विविध शस्त्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले.

         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे यांनी केले व यशस्वीतेसाठी अजय डोंगरे, समाजसेवा अधीक्षक, हरिचंद कटरे व सचिन ढोले व संस्थेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.