माता रमाईचा आदर्श आजच्या स्त्रियांनी स्वीकारावा

0
20

प्रा. विजयाताई मारोतकर यांचे प्रतिपादन
गोंदिया : माता रमाई ने ज्या प्रमाणे विकट परिस्थितीचा सामना करून डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना पुढे जाण्यास मदत केली, त्याच प्रमाणे आजच्या काळात स्त्रियांनी त्यांचा आदर्श घेवून आपल्या कुटुंबाची काळजी घेत जिवन व्यापण करावे. जेणे करुन प्रगत समाज निमार्ण होण्यास मदत होईल. या आशयाचे विचार प्राचार्य विजयाताई मारोतकर यांनी त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती प्रीत्यर्थ व्यक्त केले.
विश्वभूषण, भारतरत्न, परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, गोंदिया च्या वतीने आयोजित माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती चे आयोजन करण्यात आले होते. समितीचे अध्यक्ष अक्षय वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी च्या रुपात डॉ. माधुरी नासरे, डॉ. पद्मिनी तुरकर, डॉ सविता बेदारकर, श्रीमती सुशिला जी भालेराव उपस्थित होत्या. त्या प्रसंगी वेगवेगळया क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाºया महिलांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन महिला संयोजिका स्वाति वालदे व प्रास्ताविक अक्षय वासनिक यांनी केले. त्या नंतर गंधार म्युजिकल ग्रूप तर्फे भिमगितांचे सादरीकरण करण्यात आले. यशस्वितेसाठी अध्यक्ष अक्षय वासनिक, कार्याध्यक्ष रोहन रंगारी, संयोजक कृष्णकुमार कठाने, महिला संयोजिका स्वातीताई वालदे, महासचिव अरविंद नागदेवे , आकाश टेंभुर्णीकर , वेदांत गजभिये, कोषाध्यक्ष रंजीत बंसोड, नियंत्रक नागरत्न बन्सोड, संघटक अमर राहुल व प्रतिक बन्सोड, सहसंघटक मिलिंद बागडे, लक्ष्मीकांत दहाटे, महिला सहसायोजिका स्विटीताई वैद्य व प्रीतिताई कसारे, आकाश इंदुरकर, क्षितिज वैद्य, अंकुश कामडे, निशांत वाहने, सागर गेडाम व सर्व महिलांनी प्रयत्न केले. कार्यक्रमात धीरकुमार मेश्राम, विलास राऊत, रतन वासनिक, अनील सुखदेवे, श्याम चौरे,निलेश देशभ्रतार, भूपेंद्र वैद्य, देवा रूसे, विनित सहारे, सुशील ठवरे, सुनिल आवडे, दर्पण वानखेडे, राजेश भोयर,कारण चिंचखेडे, बसंत गणविर, रवि भालाधरें, प्रवीण बोरकर, शैलेश टेंभेकर, अनिल डोंगरे, बंटी भालेराव, रूनल माने, चेरीस खांडेकर, प्रणव चौरे उपस्थित होते.