उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पोलीस विभागाल्या मिळाल्या ४५ मोटार सायकल

0
37

गोंदिया,दि.09ः- राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(दि.09) आपल्या गोंदियाच्या एकदिवसी दौर्यादरम्यान गोंदिया पोलीस विभागाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मिळालेल्या ४५ मोटार सायकल बिरसी विमानतळावर आयोजित कार्यक्रमात हस्तांतरित केल्या.यातील ३७ वाहने ही ‘डायल ११२’ करिता व ८ वाहने पोलीस स्टेशनच्या कामांकरिता वापरली जाणार आहेत. पोलिसांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली.यावेळी खासदार प्रफुल पटेल,जिल्हा परिषद अध्यक्ष पकंज रहागंडाले,गडचिरोली गोंदिया क्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदिप पाटील,पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, आमदार विनोद अग्रवाल,आमदार विजय रहांगडाले,माजी पालकमंत्री डाॅ.परिणय फुके,माजी आमदार गोपाल अग्रवाल,जिल्हा परिषद सभापती सोनु कुथे,गजेंद्र फुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.