गोरेगावच्या मुख्य मार्गावरील स्ट्रीट लाईट सुरु करा-टेंभरे यांची मागणी

0
13

गोरेगाव,दि.09ः गोरेगाव शहरातील मुख्य रस्ताच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस झाले.मात्र या मुख्य मार्गावर लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटच्या खांबावरुन दिव्यांचा प्रकाश कधी होणार अशा प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाने त्वरीत स्ट्रीट लाईट सुरु करावी अशी मागणी भाजपचे सहकार नेते रेखलाल टेंभरे यांनी केली आहे. गोरेगाव शहरातील निवासी व प्रवाशांना या मार्गावरुन रात्री अंधारात प्रवास करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात संबंधित विभागाकडे वारंवार विचारणा करुन निवेदन देऊन सुद्धा स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आलेली नाही. जर त्वरित स्ट्रीट लाईट सुरु करण्यात आली नाही आंदोलन करु असा इशारा रेखलाल टेंभरे यांनी दिला आहे.