श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव :श्रद्धेने फुलली संतनगरी

0
17

एक लाखोंच्यावर भाविकांनी श्रीच्या चरणी ठेवीला माथा,

शेगाव दि.१३ –श्री संस्थेव्दारे श्रींचा १४५ वा प्रगटदिन उत्सव दि.०६/०२/२०२३ ते दि. १३/०२/२०२३ पर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला. या उत्सवात दररोज सकाळी ५.०० ते ६.०० काकडा, ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ से ५ प्रवचन, सायंकाळी ५.१५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन संपन्न झाले. सप्ताहात श्री ह.भ.प. मंगेश बुवा वराडे, मोताळा, श्री ह.भ.प. प्रकाश बुवा शास्त्री, धुळे, श्री ह.भ.प. राम बुवा डोंगरे, जाटनांदूर, श्री ह.भ.प. सच्चिदानंद बुवा कुलकर्णी, परभणी, श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर बुवा ईटखेडे, मेहूण, श्री ह.भ.प. अनंत बुवा बिडवे, बार्शी, श्री ह.भ.प. श्रीहरी बुवा वैष्णव, जालना, श्री ह.भ.प. श्रीराम बुवा ठाकूर, परभणी आदी कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले.
श्री महारूद्र स्वाहाकार यागास माघ वद्य. १ ला प्रारंभ होवून माघ वद्य ७ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती झाली. तसेच ‘श्रींच्या प्रागट्टया निमित्य श्रीहरी कीर्तन होवून कार्यक्रम संपन्न झाला.
यावर्षी श्री प्रगटदिन उत्सवांत ९५८ दिंड्या व एकूण ४७,८८३ वारकरी येवून गेलेत. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण १३२ नविन दिंड्यांना १० टाळ, १ विणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताक वितरीत करण्यात आल्या, जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्तीकरीता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजनप्रसादाची व्यवस्था विसावा संकूल येथे करण्यात आली. तसेच उत्सव काळात श्री शेगांवसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा प्रगटदिन उत्सव संपन्न होऊन १,८५,००० भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, अशारितीने श्री कृपेने वारकऱ्यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे. असे श्री संस्थान तर्फे कळविण्यात आले.