खेड येथे घराच्या खोदकामात आढळली कृष्ण मूर्ती

0
17

ब्रम्हपुरी-शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावरील मौजा खेड येथे गजानन मानकर यांच्या घराचे घरकुल निधीतून बांधकाम करण्यात येत आहे. तर त्यांच्या बाजूला आणखी दोन मानकर परिवाराच्या घरांचे बांधकाम घरकुल निधीतून करण्यात येत आहे. गजानन मानकर यांच्या बांधकामाच्या लगत शौचालयासाठी खोदकाम सुरू केले असता (दि.११) केवळ सात फुटांवर आडव्या अवस्थेत दगड दिसून आले. संपूर्ण दगड बाहेर काढून स्वच्छ केले असता पांढर्‍या अखंड दगडावर सुबक अशी कृष्णाची मूर्ती आढळून आली. ही बाब नागरिकांना कळताच बघ्यांची एकच गर्दी निर्माण झाली. शहरालगत भूगर्भात अनेक पुरातन शिल्प असल्याचे जाणकार सांगतात. येथील कोट तलावात भूमिगत मार्ग असून तो वैरागड पयर्ंत गेला असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने सर्व्हे करून पुरातन वास्तू भूगर्भातून बाहेर काढाव्या, अशी मागणी नागरिक करीत आहेत.