महिना भरात नुकसानभरपाई मि ळावी यासाठी कायदा करू – मुनगंटीवार

0
14

– तिरोड्यात महाआरोग्य शिबिर, 11 कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन

तिरोडा,दि.14 : रानडुकर व इतर वन्यप्राण्यांच्या उपद्रव्याने शेतपिकांचे प्रचंड नुकसान होते.याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसतो.शेतकर्‍यांना आर्थिक हातभार देण्यासाठी शासनाने नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ केली आहे. नुकसानग्रस्ताना मिळणारी वाढ ही अल्पच आहे.नुकसान भरपाई दुप्पट मिळावी आणि तिही महिना भरात मिळावी यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा करू,अशी ग्वाही राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.ते आमदार विजय रहांगडाले यांच्यातर्फे रविवार 12 फेब्रुवारी रोजी आयोजित महा आरोग्य शिबिर,ग्रापं पदाधिकारी,आशा सेविकांचा सत्कार व 11 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर,खा.सुनिल मेंढे,जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले,भाजयुमो अध्यक्ष
ओम कटरे,बांधकाम सभापती संजय टेंभरे,माजी आमदार हेमंत पटले,खोमेश्वर रहांगडाले,बाळा काशीवार,भजनदास वैद्य,पंस सभापती कुंता पटले,उपसभापती हुपराज जमईवार आदींसह मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
पुढे मुनगंटीवार म्हणाले, आता खर्‍या अर्थाने राज्यात जनतेचे प्रश्न सोडवणारे सरकार आले आहे. आपण
शेतकर्‍यांची भावना जानतो,येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कृषी पंपासाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा
करण्या संदर्भात निर्णय घेऊ.दिला शब्द पुर्ण करणे आमची संस्कृति आहे.अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून
धानउत्पादकांना बोनस देऊ.पानी असेल तर शेतकरी राजा सोनं पिकवेल,यासाठी निमगाव प्रकल्पासाठी निधी
उपलब्ध करून येथील सिंचनाची समस्या दूर सारू.आरोग्य शिबिरांच्या माध्यमातुन गोरगरिब जनतेच्या अनेक
व्याधिंचे निदान करून उपचार व औषोधोपचार केला जातो.यावेळी त्यांनी प्रत्येक गरजूपर्यंत आरोग्य कार्ड पोहचविण्याचे आवाहन केले.आ.विजय रहांगडाले यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद असून रहांगडाले यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराची स्तुती मुनगंटीवारांनी केली.यावेळी त्यांनी येत्या मंत्रीमंडळच्या विस्तारात जिल्ह्याच्या विकासाठी रहांगडाले यांना 25 टक्के मंत्री पदाची खात्री ही व्यासपीठा वरून दिली.प्रसंगी आशा सेविका ग्रापं पदाधिकारी यांचा उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला मिळणार वाघ
गोंदिया -भंडारा जिल्ह्याचे वैभव असलेल्या नवेगाव-नागझिरा अभयारण्यात व्याघ्र दर्शनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक
येतात. मात्र व्याघ्र दर्शन होत नसल्याने त्यांची निराशा होते.यामुळे येथील पर्यटक संख्या ही रोडावली आहे.ही बाब
खा.मेंढे यांनी मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिली.या नंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला वाघ-वाघिणीचे
जोडपी देणार आणि महिना -दोन महिन्यात खा.मेंढे,आ.रहांगडाले यांच्या हस्ते पिंजर्‍याचे व्दार उघडू असे सूतोवाच
मुनगंटीवार यांनी केले.