एकोडी येथे चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंती साजरी

0
17

गोंदिया-तालुक्यातील एकोडी येथे १२ फेब्रुवारीला ग्राम एकोडी येथे चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंती कार्यक्रम जिरादेवी प्राथमिक शाळेच्या पटांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय पोवार समाजाचे अध्यक्ष मुरलीधर टेंभरे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक जि.प.सदस्य अश्‍विनीताई पटले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला रंगमंच पूजक राधेलाल पटले, दिपप्रज्वलक राजेश कटरे, अशोक रीनायत तर पं.स.सदस्य प्रमुख अतिथी अजाबराव रीनायत, सरपंच शालूताई चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य रेखाबाई चौधरी, संगीताताई रिनायत, रंजूताई पटले, दिपक रिनायत, नामदेव बिसेन, राकेश बिसेन, विक्की हरीणखेडे, चुन्नीलाल बिसेन, खुमेश तूरकर, लक्षमन पटले, चंद्रप्रभाताई पटले, दिपालीताई पटले, तेजराम हरीणखेडे, पांडुरंग रहांगडाले, विठ्ठल रहांगडाले, घनश्याम रिनायत, काफीलाल चौधरी, रविश्याम बिसेन, नंदलाल बिसेन, जगत पटले, पुरणलाल पटले, हंसाराम पटले, भैय्यालाल चौधरी, बसुद्रा पटले, बाबूलाल चौधरी, डॉ. शुभम बिसेन, विष्णूदयाल बिसेन, इंजी.सुनील रिनायत, बाळा रीनायत, योदीलाल बिसेन, प्रितम बिसेन, मोहित बिसेन, छोटू पटले, दुर्जन टेंभरे यांच्यासह गावातील समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव बिसेन यांनी केले. मान्यवरांनी समाजाच्या वाटचालीवर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. संचालन राजेन्द्र सोनवाणे व आभार प्रदर्शन रवी पटले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोवार समाज संघटनेचे द्वारकानाथ रहांगडाले, नंदकिशोर बिसेन, जितेंद्र बिसेन, दिनेश टेंभरे, ज्ञानेश्‍वर भगत, उमेश हरीणखेडे, गौरव पारधी, भुमेशवर रहांगडाले, प्रविण चौधरी, प्रतिक रहांगडाले आदिंनी पर्शिम घेतले.