प्रतापगडावर झाला हर हर महादेवाचा गजर….लाखो भाविकांची गर्दी

0
26
गोंदिया –  ४०४ वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या राष्ट्रीय एकात्मतेचे हिंदू-मुस्लीम सलोख्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या ,धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राज्यात व देशात प्रसिद्ध असलेल्या प्रतापगडच्या ऐतिहासिक यात्रेला आज १८ फेब्रुवारी रोज शनिवारपासून महाशिवरात्रिला प्रारंभ झाला आहे. यात्रेदरम्यान राज्यातील व परप्रांतीय लाखो भाविकांनी प्रचंड उत्साहात हजेरी लावून हर हर महादेवाचा नारा दिला. प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन शिव मंदिरात लाखो भाविकांनी सकाळपासूनच दर्शन घेतले व मोठ्या जल्लोषात हर हर महादेवाचा नारा गेल्या तीन वर्षानंतर या प्राचीन मंदिराने आज अनुभवला. 23 फेब्रुवारी पर्यंत यात्रा सुरू राहणार आहे. मात्र कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ३ वर्षांपासून ही यात्रा जिल्हा प्रशासनातर्फे  रद्द करण्यात आली होती. कोरोना काळात महाशिवरात्रिची ऐतिहासिक यात्रा  रद्द झाल्याने भाविकांची घोर निराशा झाली होती. त्याची कसर तीन वर्षानंतर लाखो भाविकांनी आज काढली. हे येथे उल्लेखनीय आहे. प्रतापगड यात्रेत येणाऱ्या  भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. १६ फेब्रुवारी रोज गुरुवार पासूनच भाविकांचे पोहे पोहा चालला महादेवा हर हर महादेव अशा घोषणा देत प्रतापगडच्या दिशेने जथेच्या जथे आगे कूच करीत आहेत.भाविकांच्या व्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासन ही सज्ज असल्याचे दिसून आले.
पायथ्यापासून ७ किलोमीटर उंचीवर प्रतापगड किल्ल्याच्या कड्यात एका दरीत स्थापित असलेल्या प्राचीन भगवान शंकराचे मंदिरावर लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने प्रचंड गर्दीत, मुक्या उत्साहात आभार वृद्धांपासून तर युवकांपर्यंत महिला पुरुष मोठ्या श्रद्धेने शिव मंदिराकडे जाताना दिसून आले. या मंदिरात नवस तर काही नी नवस कबूलतांना दिसले. पूजा अर्चना करीत व आपले सुखदुःख भोळ्या शंकराच्या कानी घालतांना वृद्ध भाविकांपासून महिला पुरुष युवक यांनी प्रचंड गर्दी केली होती.
प्रतापगडचे शिवमंदिर,मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले ख्वाजा उस्मान गणी हारुनी दर्गा येथे भाविकांनी हजेरी लावून दर्शन घेतले. भोले शंकराच्या दर्शनानंतर ख्वाजा उस्मान गणी हारून यांच्या मशिदीत जाऊन अनेक हिंदू बांधवांनी मोठ्या श्रद्धेने चादर चढवली. अशाप्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन यावेळी लाखो भाविकांनी घडविले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी यात्रेला भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय जनता पार्टी तसेच काही सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते तर आरोग्य विभागाच्या वतीने भाविकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिबिरे लावली होती.