धुमाकूळ घालणारा बिबट अखेर जेरबंद

0
12

 भद्रावती-शहरालगतच्या आयूध निर्माणी चांदा येथील वसाहतीत हिरा हाऊसजवळ वनविभागाने लाऊन ठेवलेल्या पिंजर्‍यात शनिवार, १८ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजताच्या सुमारास अखेर धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद झाला. या घटनेची माहिती आयूध निर्माणी प्रशासनाने वनविभागाकडे दिली असता सदर बिबट्याला वसहतीपासून गंधा नाला नर्सरीमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून पिपरबोडी व आयूध निर्माणीच्या वसाहतीत धुमाकूळ घालून चार ते पाच जणांना जखमी केलेल्या तसेच पिपरबोडी आयूध निर्माणी वसाहतीतील पाळीव प्राण्यांची शिकार देखील केल्याची माहिती होती. शेवटी आयूध निर्माण प्रशासनाने याची तक्रार वनविभागाकडे दिली असता वनविभागाने आयूध निर्माण वसाहतीच्या हिरा हाऊस परिसरात चार दिवसांपूर्वी तीन ठिकाणी त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे बसविण्यात आले होते. सदर पिंजर्‍यात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बकरीचे अमिष दाखविण्यात आले होते.
सदर पिंजरे सहा. वनसंरक्षक (तेंदू) निकिता चौरे, सहा वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले व भद्रावतीचे क्षेत्र सहायक विकास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आले होते. वनविभागाच्या चार दिवसांच्या अथक पर्शिमानंतर शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अखेर बिबट्या जेरबंद झाला. सदर बिबट्याला सद्या वनविभागाच्या गंधा नाला नर्सरीमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.