बकरीला वाचवण्यासाठी तो थेट बिबट्याशीच भिडला

0
20

गडचिरोली,दि.19ः–  बिबट्याच्या तावडीतून बकरीला सोडवण्यासाठी गुराखी थेट बिबट्याशी भिडला. या झटापटीत गुराखी गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरातील ही घटना असून खुशाल उरकुडा कोहळे (५८ रा.देऊळगाव) असे त्या गुरख्याचे नाव आहे.  खुशाल उरकुडा हे मजुरीची कामे करतात. रिकाम्या वेळात ते गुरेही चारतात. शनिवारी दुपारच्या सुमारास ते देऊळगाव येथील टेकडीवर बकऱ्या चारण्यासाठी गेले होते.दरम्यान जवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील एका बकरीवर हल्ला केला. हे बघून खुशाल क्षणाचाही विलंब न करता बकरीला वाचवण्यासाठी थेट बिबट्यावर धाऊन गेले. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांना कपाळावर आणि मानेवर गंभीर दुखापत झाली. दरम्यान आवाज एकूण आसपासच्या नागरिकांनी कळपाच्या दिशेने धाव घेतल्याने बिबट्या जंगलात पळून गेला. माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व खुशाल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.