सावित्रीबाई व फातिमा शेख यांच्यामुळे महिलांना समाजात हक्काचे स्थान :रविकांत बोपचे

0
20

तिरोडा,दि.19ः-पूर्वीच्या काळात समाजात महिलांना दुय्यम स्थान होते.चुल आणि मुल ह्या गोष्टींमध्ये महिलांचे जीवन निघून गेले.मात्र जाती पाती,चालीरीती व रुढी परंपरावर मात करत सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.यामुळे आज महिला आपल्याला सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांनी स्त्री शिक्षणा करिता घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे आज महिलांना समाजात हक्काचे स्थान मिळालेले आहे,असे प्रतिपादन राकाँचे युवा नेते रविकांत बोपचे यांनी केले.
तालुक्यातील डाकराम सुकळी येथे आयोजित महिला मेळाव्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरुन ते
बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.सदस्य जगदीश बावनथडे यांनी केले.याप्रसंगी माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले, पंस सदस्य कविता सोनेवाने,तुंडीलाल शरणागत,सरपंच आय.जी.पटले,आशा बिसेन,रवि पटले,जितेंद्र जांभुळकर,राज
सोनेवाने,सरपंच सुनिल मेश्राम,उपसरपंच संदीप कुर्वे,चंद्रशेखर बिसेन,प्रमिला शेंडे,कल्पना उके,रुपाली राणे,पोमेश्वर बावनकर,हर्षवर्धन मेश्राम आदिंसह महिला भगिनी व गावकरी उपस्थित होते.