आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

0
16

गोरेगाव – गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे  दिनांक १९ फरवरी ला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे. जे. पटले हे होते. तर प्रमुख पाहुणे मोहाडी ग्रांम पंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, संस्थेचे उपाध्यक्ष मदनलाल बघेले, संस्थेचे सचिव ग्रंथ्रमित्र वाय. डी.चौरागडे, सदस्य हिरालाल महाजन, देवदास चेचाने,वाय. एफ. पटले,प्रमानंद तिरेले,आशा चेचाने,कुल्लु वरखडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करतानी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे जाती धर्माच्या भिंती भेदुन माणसाला माणुसकीने जगायाला शिकविणारे राज्य म्हणजे – शिवरायांचे स्वराज्य – होय यावेळी कार्यक्रमाचे संचालन व आभार सुभाष चौरागडे यांनी केले.