छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणा देणारे:- प्रा. डॉ. युवराज मेश्राम

0
16

अर्जुनी मोरगाव,दि.20ः जनतेचा कल्याणकारी राज्य निर्माण करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण त्यांच्या विचारांचा विसर पडत चाललेला आहे. आज युगात आपण आपल्या मुलांना उत्तम नौकरी लावु सकत नाही. आपन शिवाजी महाराजांना डोक्यावर नाही तर महाराजांचे विचार डोक्यात घेऊन चाला. आणि वाचनाकडे लक्ष द्यावे. वाचनाने मस्तक सुदरते आपल्या मुलांना शिकवा. आणि महाराजांचे विचार आत्मसात करा असे प्रतिपादन प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांनी केले.
ते स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड व समता सैनिक दल यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरपंचायतचे सभापती दानेश साखरे हे होते.जि प सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी उद्घाटन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे,आर पी आय चे विदर्भ सचिव यशवंत उके,नगरसेवक राधेश्याम भेंडारकर,अतुल बंसोड, प्रभाकर दहिकर, प्रदिप ढवळे, विजय बसोड,धम्मदिप मेश्राम, प्रितम रामटेके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधेश्याम भेंडारकर मांडले. संचालन आकाश ठवरे यांनी केले. आभार मिथुन मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सप्त खंजेरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला.