कॉम्रेड गोविंद पानसरेंचे खुनी व सूत्रधारांना शिक्षा कधी होणार ? जवाब दो?आंदोलन

0
22

गोंदिया-भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यव्यापी आंदोलनातंर्गत आज भारतीय कम्युनिस्ट पार्टी गोंदिया जिल्हा कौंसिलचे नेतृत्वात डाॅ.बाबासाहेब आम्बेडकर प्रतिमे समोर नविन प्रशासकीय ईमारतीच्या गेट वर, 4 तास धरने आंदोलन करण्यात आले. या माध्यमातुन एसडीओ यांना मुख्यमंत्र्याचे नावे निवेदन सादर करण्यात आले. धरणे आंदोलनाची सुरूवात पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्तेकॉ.सि.के.ठाकरे यांचे अध्यक्षतेत कॉम्रेड पानसरे यांचे तैलचित्रावर माल्यार्पण करूण करण्यात आली. सभेचे प्रस्ताविक पक्षाचे जिल्हा सहसचिव काॅ. रामचंद्र पाटील यांनी केले. धरणे आंदोलनाला राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. हौसलाल रहांगडाले, वंचित बहुजन आघाड़ीचे जिल्हाध्यक्ष सतिश बंसोड़ सर, विश्वभुषन भारतरत्न प.पु.भारत डाॅ.बाबासाहेब आम्बेडकर सार्वजनिक जयंती ऊत्सव समिती(रजि.)चे अध्यक्ष अमित भालेराव,भिमघाट स्मारक समितीचे अध्यक्ष श्याम चौरे, सामाजिक कार्यकर्ते एड.अशोक बोरकर, कमलेश ऊके आदि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनांच्या या आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला. पक्षाचे शेखर कनोजीया,प्रल्हाद ऊके, कल्पना डोंगरे, आदिनीं धरणे आंदोलनाला संबोधित केले. या आंदोलनाचे समारोपीय भाषण जिल्हा सचिव काॅ.मिलिद गनवीर यांनी केले.या धरणे आंदोलनात प्रामुख्याने सर्व कॉम्रेड करूणा गणवीर, जितेंद्र गजभिए, साजीद कुरेशी,दुलीचंद कावड़े,सुरेश रंगारी, राजेश वैद्य, प्रकाश डहाट, क्रांती गणवीर, रायाबाई मारगाये, नेवल मारगाये,अनिटर बंन्सोड़ ,साहिल बड़गे सह मोठ्या संख्येत कार्यकर्ते शामील होते. या आंदोलनाचे माध्यमातुन कॉम्रेड पानसरे यांची हत्या होऊण 8 वर्षे झाली पण अजुन ही गुन्हेगारांना शिक्षा का म्हणुण नाही? या खुनाचे सुत्रधार मोकाट का?असा सवाल करत निवेदनात
मारेकर्‍यांना/हत्यार्‍यांना त्वरित जेरबंद करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे गृह खाते, त्यांच्या तपास यंत्रणा न्यायालयास योग्य ते पुरावे सादर केले पाहिजे,अशी मागणी करण्यात आली.कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांना फाशी ची शिक्षा झाली पाहिजे. या साठी राज्य सरकारने न्यायालयात या अनुषंगाने योग्य तपास करून सक्षम पुरावे सादर करण्याची मागणी करण्यात आली.