अखेर…बग्गा प्रकरण पोलिसांकडे देण्यास बांधकाम विभाग लागले कामाला

0
23

गोंदिया– गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत असलेल्या कंत्राटदार पी.ए.बग्गा प्रकरणात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्यावतीने अखेर आज 21 फेबुवारीला गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रकिया सुरु करण्यात आली आहे.विशेष म्हणजे बग्गा प्रकरण साप्ताहिक बेरार टाईम्सने बाहेर काढून सातत्याने जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधत बग्गा प्रकरणात टेंडर लिपिकासह अधिकारयाची चौकशी कधी होणार या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन मुख्यमंत्री व पालकमंत्र्याना या प्रकरणात सखोल चौकशीकरीता लक्ष वेधले होते.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला जाग आली असून कागदपत्रांची जुळवाजुळव करुन सदर प्रकरणात तक्रार दाखल करण्याकरीता पोलिसाकंडे कागदपत्र सोपवण्यात आली.मात्र बांधकाम विभागाने तक्रार दाखल करतांना पुन्हा हयगय करीत ज्या स्वाक्षरीच्या आधारे टेंडरप्रकियेत गोंधळ घालण्यात आला.तीच कागदपत्र पोलिसांकडे सादर न केल्याने पुन्हा सर्व कागदपत्र सादर करण्याच्या सुचना पोलीस विभागाने दिल्या,त्यानुसार कागदपत्रे सादर केल्यानंतरच गुन्हा दाखल होणार आहे.

बग्गा विरुध्द कारवाई करण्यासाठी बांधकाम विभागाने पुढाकार घेतला असला तरी त्या प्रकरणात टेंडर क्लर्क याचीही तेवढीच महत्वाची भूमिका असून तडजोडीच्यावेळी उपस्थित अधिकारी यांनीही कागदपत्रावरील स्वाक्षरी का बघितली नाही.की बघून त्यांनी जाणिवपुर्वक कानाडोळा केला याचा उलगडा होण्यासाठी या तक्रारीत संबधित कंत्राटदारासह टेंडर क्लर्क आणि संबधित सर्वांचीच चौकशीचा उल्लेख त्या तक्रारीत होणे गरजेचे आहे.तेव्हा कुठे या प्रकरणात सर्वसंधी उपलब्ध करुन देणारा कोण क्लर्क आणि अधिकारी याचाही उलगडा होईल.अन्यथा आम्ही तर पोलिसात चौकशीकरीता कागदपत्र सादर केले आत्ता आमची काय भूमिका असे म्हणून झालेल्या चुकीच्या प्रकरणावर जिल्हा परिषदेतील काही अधिकारी पांघरूण घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या प्रकरणात पोलीस विभागाला सुध्दा पारदर्शक चौकशी करुन दोषी कंत्राटदारासह शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचीही चौकशी करुन सत्य पुुढे आणून पोलिसांची कारवाई ही पारदर्शकच असते हे दाखवावे लागणार आहे.