महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खा.पटेलांचा पाठिंबा

0
30

गोंदिया,दि.21ः– राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २0 फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय काम बंद आंदोलन पुकारले असून गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयाती कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.या आंदोलनाच्या आजच्या दुसर्या दिवशी माजी केंद्रीयमंत्री व राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी भंडारा येथे आंदोलकांच्या मंडपाला भेट देत त्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन,आमदार राजु कारेमोरेसह इतर मान्यवर उपस्थित होते.
मागील चार वर्षापासून शासनाच्या स्तरावरप्रलंबित असलेल्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करणे.१०,२०,३० लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे.१ जानेवारी २०१६ ते ३१ऑक्टोंबर २०२० अखेर प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला त्या दरम्यानची फरकाची थकबाकी व १४१० विद्यापिठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करणे.विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे. २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणे या ६ प्रमुख न्याय मागण्याना घेऊन 20 फेबुवारीपासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे.