मोहाडी ग्रामपंचायत येथे वीस लक्ष रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन

0
21

गोरेगाव,दि.22ः-तालुक्यातील मोहाडी ग्राम पंचायत येथे आज २२ फेब्रुवारीला वीस लक्ष रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यात पंधरा वित्त आयोग अंतर्गत पाच लक्ष,सिमेंट काँक्रिट रस्ता, M R E G S अंतर्गत पाच लक्ष,सिमेंट काँक्रिट रस्ता, समाजकल्याण विभाग अंतर्गत ग्राम सचिवालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम पाच लक्ष,पंधरा वित्त आयोग अंतर्गत व्हेरिगंकोट सिमेंट काँक्रिट बांधकाम दोन लक्ष व ग्राम सचिवालय येथे तीन लक्ष,सीडी वर्क सिमेंट काँक्रिट बांधकाम तीन लक्ष आदी कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मणजी भगत, पंचायत समिती सभापती मनोज बोपचे, ग्राम पंचायत सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, पंचायत समिती सदस्य रामेश्र्वर माहरवाडे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले, उपसरपंच मोहनलाल पटले,कमलेश पटेल,वाय.एफ.पटले,जे.जे.पटले, माजी उपसरपंच श्रीराम पारधी,ग्रां पंचायत सदस्य योगराज भोयर,खेमराज वाकले,प्रभा पंधरे, पुजाताई डोहाळे, चंन्द्रकांता पटले, पुस्तकला पटले, नेहाताई उके, सामाजिक कार्यकर्ता हिरालाल महाजन, बाबुलाल चौव्हण,धिरज रांहागडाले,मोहनकिशोर मौदेकर, सीताराम भोयर, जितेंद्र कानडे, सेवानिवृत्त सैनिक कुवरलाल चौधरी, हिरामण पटले , योगेश्वर पटले, योगेंद्र बिसेन,गुणीलाल बघेले आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रामसेवक पी बी टेंभरे यांनी मानले.