महावितरण राज्य किडा स्पर्धेत गोंदिया परिमंडळ उत्तम कामगीरी

0
16

गोंदिया दि.२२.:- जळगाव येथे आयोजित महावितरण राज्य किडा स्पर्धेत उत्तम कामगीरी करून गोंदिया, चंद्रपुर, नागपुर या तिन्ही जिल्हयाने एकत्रित प्रथम स्थान मिळवून दिले.खेळाडू वृत्ती जोपासत स्पर्धेमध्ये उतरलेले या सर्व कर्मचा-यांचा त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल मंगळवारी एका कार्यक्रमात गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण यांनी सर्व खेळाडुचा मनपूर्वक सत्कार केला. कार्यक्रमाला अधिक्षक अभियंता (प्रभारी) धम्मदिप फुलझेले व सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) असित ढाकणेकर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. कार्यकमाला यावेळी उत्कृष्ठ महिला खेळाडुचा सुद्धा करुन सत्कार करण्यात आला.

तसेच, सलग पाच वेळा स्पर्धेत पुरस्कार घेणा-या खेळाडुचाही सत्कार यावेळी आयोजकाकडुन करण्यात आला.सोबत, लांब ऊळी, भाला फेक, कबड्डी, खो खो व अंत्यपुरस्कार प्राप्त खेळाडुचा सत्कारही त्यांच्या उल्लेखनीय कामगीरी वर करण्यात आला. या सोबतच उंच ऊळी या स्पर्धेत कमी क्रमांक घेवुन सर्वांची मने जिंकली. व पुरस्कार मिळणा-या श्रीमती सरीता सराटे यांनी सर्वच क्रमांक मिळवू शकली नाही. यावेळी त्यांचाही आयोजकातर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात सर्व कबड्डी व खो खो महिला खेळाडूचा श्रीमती स्वाती दमाहे, लता भस्के, स्वाती गेडाम, नम्रता मेश्राम, वंदना कापसे, स्वेता देशमुख, पायल अग्रवाल, सरोज भोवटे याचे किडा स्पर्धेत विशेष कामगिरी केल्याबद्दल महावितरण गोंदिया परिमंडळ प्रशासनाने सत्कार केला. कुस्ती या (शारीरीक शक्तीवर) आधारीत खेळामध्ये महेंद्र कोसरे (वनज गट ९२ कि.) यांचेसुध्दा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. ब्रिज या खेळात पेअर प्रोग्रेसिव्ह स्पर्धेत सलग तिस-यांदा पारीतोषीक मिळालेल्या पंकज आंधाळे व महेश मेश्राम यांचाही पुरस्कार देवून गौरव करण्यात आले.

ब्रिज या क्रिडा स्पर्धेत मनिष बड़े प्रतिक शहारे, व अतुल सार्वे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार मिळाला, विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या किडा स्पर्धेत निवड झालेल्या सहा पैकी पाच खेळाडू हे गोंदिया परिमंडळातील होते हे विशेष

तसेच, व्हालीबाल स्पर्धेत प्रकाश विधातोरे, पियुष गोसेवाडे व लोकेश जिवितोडे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगीरीबद्दल पुरस्कार देण्यात आला. तसेच कबड्डी स्पर्धेत कैलास कामने,पवन कलाम,जितेंद्र श्रीसागर व राहुल गाढवे यांचेसुध्दा सत्कार करण्यात आला.

खो खो स्पर्धेत राजेश मेश्राम (खो खो व ४०० मी धावने), आशीष डोंगरवार, महेश उडके, आकाश खरात यांचासुध्दा सत्कार करण्यात आला. तसेच बुध्दीबळ या स्पर्धेत राहुल कुर्वे यांची सेमीफायनल पर्यंत पोहोचल्याबद्दल त्यांची सर्वांनी पसंशा केली.

धावणे, या स्पर्धेत कपील बेरमवार १५०० मी. धावने केले यांनापण या स्पर्धेत पुरस्कार प्राप्त केला व त्यांचा पण सत्कार केला.थाळीफेक स्पर्धेत श्रीनिवास जाधव यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाचे मुख्य अभियंता यांनी उपमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी अनंत चवरे व विधी अधिकारी प्रशांत मडावी यांचा, जळगाव येथील झालेल्या कार्यक्रमात, विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन कु. कल्यांनी मेश्राम व तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनीष बढे यांनी केला.