37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ …अखेर कंत्राटदार बग्गा प्रकरणात पोलीस तक्रार दाखल

…अखेर कंत्राटदार बग्गा प्रकरणात पोलीस तक्रार दाखल

0
47

blank

गोंदिया,दि.22ः– गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत असलेल्या कंत्राटदार पी.ए.बग्गा प्रकरणात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्यावतीने अखेर आज 22 फेब्रुवारीला गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांनी तक्रारीसोबत 600 पान कागदपत्र या प्रकरणातील तपासाकरीता जोडले गेल्याची माहिती देत तक्रार दाखल केल्याचे सांगितले.

21 फेबुवारीला गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रकिया सुरु करण्यात आली होती.मात्र तक्रारीसोबत टेंडरपुस्तिका आणि इतर कागदपत्रांचा समावेश नसल्याने त्या कागदपत्रांना साक्षांकित करुन आज बुधवारला पोलीस ठाण्यात सादर करण्यात आले आहे.विशेष म्हणजे बग्गा प्रकरण साप्ताहिक बेरार टाईम्सने बाहेर काढून सातत्याने जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. बग्गा प्रकरणात टेंडर लिपिकासह अधिकारयाची चौकशी कधी होणार या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन मुख्यमंत्री व पालकमंत्र्याना या प्रकरणात सखोल चौकशीकरीता लक्ष वेधले होते.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ही कारवाई केली आहे.पोलीस याप्रकरणात कागदपत्रांची तपासणी करुन कधी गुन्हा नोंदवून घेत चौकशी करतात याकडे लक्ष लागले आहे.

blank