समग्र शिक्षा समावेशीत अंतर्गत 75 बालकांची तपासणी

0
26

गोंदिया,दि.24ः- डि.ई.आय.सी (District Early Intervention Center) , के.टी.एस जिल्हा सामान्य् रुग्णालय / बाई गंगा बाई रुग्णालय गोंदिया , सुरज Eye Institute नागपुर यांचे विशेषतज्ञ- यांच्याकडुन जागरुक पालक सुद्रुढ बालक व समग्र शिक्षा समावेशीत शिक्षण अतर्गत संदर्भीत संशयित बालकांची डोळ्यांची ROP , Squint , Ptosis (विशेष नेत्र) व OAE , BERA तपासणी करण्यात आली. याकरीता सुरज Eye Institute च्या चमुने 75 संशयित ROP , Squint , Ptosis बालकांची व OAE 29 , BERA 1 बालकांची तपासणी केली. त्यामध्ये 22 बालकांना उपचाराकरीता पुढील संदर्भ सेवा करण्याकरीता महात्मा ज्योतीबा फुले योजना अतर्गत मोफत पाठविण्यात येणार आहे. त्याकरीता समुपदेशन करण्यात आले.असे शिबीर प्रत्येक महिण्याच्या दुसरा व चौथ्या गुरुवारला डि.ई.आय.सी (District Early Intervention Center) , बाई गंगा बाई रुग्णालय गोंदिया येथे घेण्यात येते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी. जैस्वाल आणि डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शिबिरामध्ये डि. ई. आय. सी व्यवस्थापक पारस लोणारे ,राबास्वकाचे संजय बिसेन, समग्र शिक्षाचे विजय ठोकणे तसेच डि. ई. आय. सी चे डॉ. प्रदीप गुजर , डॉ. क्रिष्णकुमार त्रिपाटी, डॉ. नागेश सेवारे अजिंत सिंग, रोशन कुर्वे , प्रकृती मनोहर , टि. एन. लिल्हारे, अमित शेंडे, पुजा बैस, रिता नेवारे, सोनल मानकर, शालिनी यादव , अनिरुध्द शर्मा, सुनिल गौतम, प्रियंका मडामेकर , कल्पना राहुलकर ,मजुषा बांबोर्डे आणि सर्व DEIC, SNCU , RBSK व SSA अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य करुन सदर शिबिर यशस्वी केले.