पशुसंवर्धन विभागाच्या फिरता दवाखाना वाहनावर मुख्यमंत्री शिंदेंऐवजी ठाकरेंचेच छायाचित्र

0
25

गोंदिया,दि.25ः- राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन ८ महिने लोटले. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या फिरता दवाखाना वाहनावर अजूनही उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असल्याचे माहिती फलक (स्टीकर्स) दिसून येत आहे. पशुसंवर्धन विभाग अद्ययावत कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आज पशुसंवर्धन विभागाला भेट दिली असता, कार्यालयाच्या आवारात ही वाहने दिसून आली. त्यावर वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे छायाचित्र अजूनही कायम आहे. राज्यात सत्तांतर झाले हे जरी खरे असले तरी वाहनावर पोस्टरव्दारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र बदलण्यास विभाग कसे काय चुकले अशा चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांनी वाहनावरील छायाचित्र बदलण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या आदेशानुसारच  कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.