आपसी समन्वयाशिवाय गावाचा विकास अशक्य – जि. प.अध्यक्ष पंकज रहांगडाले

0
46

* जिल्हास्तरीय सरपंच परिषद, प्रशिक्षण व संकल्प मेळावा थाटात
* उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा झाला गौरव
गोंदिया- गावाचा विकास करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती हवी असते. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांना पुढाकार घेऊन स्वतः झिजावे लागते. तेव्हाच कुठे गावात विकासाला चालना मिळते. मात्र हे करताना अधिकारी व पदाधिकारी आपसी समन्वयन होणे आवश्यक आहे.समन्वयाशिवाय गावाचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले.
जल जीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग व पंचायत विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांच्या समन्वयाने दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हास्तरीय सरपंच परिषद, प्रशिक्षण व संकल्प मेळाव्याचे आयोजन न्यू ग्रीनलण्ड लान, बालाघाट रोड गोंदिया येथे करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते.
 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, उद्घाटक जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल पुंड, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती सभापती योपेंद्रसिंह टेंभरे, जि. प. महिला व बालकल्याण सभापती सविता ताई पुराम, सडक अर्जुनी पंचायत समिती सभापती संगीता खोब्रागडे, गोंदिया पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, गोरेगाव पंचायत समिती सभापती मनोज बोपचे, अर्जुनी मोरगाव पंचायत समिती सभापती कविता ताई कोडापे, सालेकसा पंचायत समिती सभापती प्रमिला गणवीर, आमगाव पंचायत समिती सभापती राजेंद्र गौतम, देवरी पंचायत समिती सभापती अंबिका बंजार, जि. प. गटनेता लायकराम भेंडारकर, गटनेता आनंदा वाडीवा, जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, जिल्हा परिषद सदस्या तूमेश्वरी ताई बघेले, जिल्हा परिषद सदस्य उषा ताई मेंढे, जि.प.सदस्या छबू ताई उईके, जि.प.सदस्य शैलेश नंदेश्वर, जि प. सदस्य पवण पटले, जि.प. सदस्य राधिका धरमगुळे, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भुमेश्वर पटले, जि. प. सदस्य प्रिती ताई कतलाम आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून लोक सहभागातून ग्रामविकास याबाबत चंद्रपूरचे चंदू पाटील मारवरकर, मी लोकसेवक याबाबत माजी सरपंच जीवन लंजे तसेच आदर्श गाव याबाबत माजी सरपंच हेमकृष्ण संग्रामे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत सविस्तर माहिती दिली. महिला व बालकल्याण सभापती सविता ताई पुराम यांनी गाव विकास करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी गाव विकासासाठी आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगून जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी तालुका पातळीवर वाचनालय सुरू करावे, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी मी शासनाच्या नवोदय विद्यालयात शिक्षण घेत प्रशासकीय अधिकारी झाल्याचे सांगत शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जातात याचे आपण एक मूर्तिमंत उदाहरण असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर प्रकाश टाकला.
याप्रसंगी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत उत्कृष्टपणे काम करणाऱ्या तसेच सन 2020-21,2021-22 या वर्षात जिल्हा स्तरावर पुरस्कार प्राप्त तसेच आर.आर.पाटील योजनेत तालुका व जिल्हास्तरावर क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीचा सत्कार उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन गजभिये यांनी तर आभाप्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नरेश भांडारकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीमती प्रमिला जाखलेकर यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) गोविंद खामकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नरेश भांडारकर,. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा सुमित बेलपत्रे यांच्या निर्देशानुसार पाणी व स्वच्छता विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सौरभ अग्रवाल, राजेश उखळकर, भागचंद रहांगडाले, विशाल मेश्राम, मुकेश त्रिपाठी, दिशा मेश्राम यांच्यासह पाणी व स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी, पाणी व स्वच्छता अंमलबजावणी सहाय संस्थेचे कर्मचारी तसेच पंचायत विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी मंजुषा चौधरी, वरिष्ठ सहायक पंकज पटले यांच्यासह जिल्हा परिषदेतील इतर विभागाच्या अधिकारी व कर्मचारी आदींनी सहकार्य केले.