14 मार्चच्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी व्हा- पी.जी.शहारे, राज्य उपाध्यक्ष यांचे आवाहन

0
73

गोंदिया,दि.०२:: कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्काची प्रमुख मागणी जुनी पेंन्श मिळालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्राच्या आवाहनानुसार दिनांक 14 मार्च 2023 पासुन राज्यातील १७ लाख शासकिय, निमशासकिय, शिक्षक –शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर जाणार आहेत. गोंदिया जिल्हयातील 30 हजार सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग असणार आहे. संपाच्या बाबतीत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने आज दिनांक 02.03.2023 रोजी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी.जी.शहारे यांचे नेतृत्वात  शितल पुंड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने प्रलंबित मागण्यांचे संदर्भात राज्य सरकारणे सकारात्मक निर्णय घ्यावे यासाठी सतत प्रयत्न केलेत परंन्तु या रास्त मागण्याबाबत शासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचारी संतप्त झाले आहेत. सर्वांना जुनी पेंन्शन योजना लागु करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसीत करु नका व इतर अनुषंगीक मागण्या दिर्घकाळा पासून प्रलंबित राहिल्यामुळे सर्वदुर महाराष्ट्रातील कर्मचारी कमालीचे संतप्त झाले आहेत.

अन्यायग्रस्तत कर्मचारी नाईलाजाने शासना विरुध्द तिव्र संघर्ष उभा करुन त्यांच्या व्यथा संघटनात्मक कृतीच्या माध्यमातून व्यक्त करण्याच्या मनस्थितीत आहेत. राज्य सरकारी मध्यवती संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून सन 1977 पासून समन्वय समितीचे नेतृत्व करीत आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक सहवेदना जाणून घेणे व निर्माण झालेल्या सामाईक समस्यांच्या निराकरणास मदत करणे हे महासंघाचे कर्तव्य आहे. त्यानुसार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत व दिनांक 12 फेब्रवारी 2023 रोजी नाशिक येथील राज्य कार्यकारीणी सभेत प्रलंबित मागण्याबाबत तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या चार वर्षातील सरकारच्या नकारात्मक धोरणाचा साकल्याने विचार करुन प्रलंबित मागण्याबाबत होत असलेल्या अन्याया विरुध्द राज्यव्यापी बेमुदत संप ओदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवेदन सादर करतांनी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी. जी. शहारे, सरचिटनिस शैलेश बैस, कार्याध्यक्ष सौरभ अग्रवाल, कोषाध्यक्ष सुभाष खत्री, जिल्हा संघटक संतोष तुरकर, उपाध्यक्ष कमलेश बिसेन, गोवर्धन बिसेन, सहकार्याध्यक्ष यज्ञेश मानापुरे, सहसंघटक आनंद चर्जे, महासंघ महिला उपाध्यक्षा कु. चित्रा ठेंगरी, महासंघ महिला उपसमिती अध्यक्ष कु. तेजस्विनी चेटुले, लिपीक संघटनेचे अध्यक्ष संतोष तोमर, कोषाध्यक्ष मनोज मानकर, उपाध्यक्ष टेकचंद चौधरी, सहसचिव अभिजित बोपचे, कार्याध्यक्ष नंदलाल कावळे, संघटक निखिल बागडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भगीरथ नेवारे, राजेश कुंभलवार, गितेश तिजारे, गोपाल शर्मा, प्रमोद काळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.