41.9 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

0
155

blank

भंडारा : शिकारीच्या शोधात जंगल परिसरातून राष्ट्रीय महामार्ग ५३ पार करणाऱ्या बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी – साकोली महामार्गावर मुंडीपार सडकजवळ असलेल्या धाब्याजवळ रात्री ११.२० वाजताच्या सुमारास घडली.

बिबट ठार झाल्याचे माहिती होताच परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. ठार झालेली बिबट अंदाजे दोन वर्षे वयाची आहे. शिकारीच्या शोधात ती रात्री राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना यादव धाबा आणि रॉयल धाबा यांच्यामध्ये पोहोचताच अज्ञात वाहनाने तिला जबर धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रात्रीच बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन लाखनी परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जांभळी नर्सरी येथे मृतदेह नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.