अपघाती निधन झालेल्या पोलीस अंमलदाराच्या कुटूबियांना विम्याचा धनादेश प्रदान

0
62

गोंदिया,दि.03ः अपघाती निधन पावलेल्या पोलीस अंमलदाराच्या कुटुबिंयास विमा रकमेचे धनादेश गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील व पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

सविस्तर असे की, चालक पोलीस नाईक / ब.क्र.३८७ कृणाल गणेश रामटेके यांचे दिनांक २७/०४/२०२१ रोजी अपघाती निधन झाले होते.त्यामुळे संचालक विमा संचालनालय महाराष्ट्र यांच्याकडुन “राज्य शासकिय कर्मचारी समुह वैक्तीक अपघात विमा योजने” अंतर्गत नामनिर्देशित व्यक्ती लाभधारक म्हणुन सुकन्या कृणाल रामटेके यांना विमा दाव्याची रक्कम रु.१०,००,०००/- चे प्रतिकात्मक धनादेश आज ०३ मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील,पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.