निवासी डॉक्टरांच्या भुमिका व जबाबदाऱ्या याबाबत परिसंवाद

0
14

गोंदिया, दि.3 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे 2 मार्च 2023 रोजी न्यायवैद्यकशास्त्र विभाग व जनऔषधी वैद्यकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी युनिट तर्फे या संस्थेत नव्याने प्रवेश घेतलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानसत्राचे (परिसंवाद) आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानसत्रामध्ये निवासी डॉक्टरांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमा दरम्यान त्यांच्या भुमिका व जबाबदाऱ्या याबाबत संस्थेतील विविध व्याख्यातांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सील, मुंबई यांच्यातर्फे प्राप्त मान्यतेनुसार या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

        सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. दस्तऐवजीकरण, रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांचेसोबत सौहार्दपुर्ण संवाद व ध्येय्यपुर्तीची खरी सुरुवात जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर होते याबाबत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला.

        सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसूमाकर घोरपडे यांनी मुख्य मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.

         न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख तसेच विद्यालयीन मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी युनिटचे मुख्य समन्वयक डॉ.विपुल अंबाडे हे या परिसंवादाचे आयोजक तसेच बालरोग विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.मनिष तिवारी हे सहआयोजक होते. या संस्थेतील डॉ.मनोज तालापल्लीवार सहयोगी प्राध्यापक व डॉ.मनू शर्मा सहाय्यक प्राध्यापक यांनी अनुक्रमे सचिव व सहसचिव म्हणून कामकाज पाहिले. सहाय्यक प्राध्यापक डॉ.अभय आंबिलकर यांनी या संपुर्ण व्याख्यानसत्राचे नियोजनात महत्वाची भूमिका पार पाडली.

         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.निता गाठे व डॉ.स्नेहा शर्मा यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.शिल्पा पटेरिया व सचिन ढोले यांनी अथक परिश्रम घेतले. या संस्थेतील कार्यरत सर्व अध्यापकवर्ग, वरिष्ठ निवासी डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकारी यांनी या परिसंवादात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.