रोजगार/स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण 

0
10
वाशिम, दि. 03  : पारंपारिक शिक्षणाशिवाय प्रशिक्षण घेवून रोजगार/ स्वयंरोजगार मिळविणे ही काळाजी गरज झाली आहे. याच आधारे केंद्र तसेच राज्य शासनस्तरावरुन विविध कौशल्य विकास योजना राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर वाशिम जिल्हयातही सन २०२२-२३ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) च्या माध्यमातून किमान कौशल्य विकास कार्यक्रम तसेच प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान अंतर्गत जिल्हयातील १५ ते ४५ वयोगटातील रोजगार/स्वयंरोजगार इच्छूक उमेदवारांना निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.
          जिल्हयातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधन सामुग्री इत्यादींच्या आधारे जिल्हयातील रोजगार/स्वयंरोजगारासाठी अधिक प्रशिक्षणाचे विशिष्ट कोर्सेस राबविणे तसेच मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करुन या क्षेत्रांच्या कौशल्याच्या मागणीनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण प्राप्त उमेदवारांना रोजगार/स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणे या उद्दिष्टाकरीता ‘किमान कौशल्य विकास कार्यक्रम आणि प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानाअंतर्गत निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु होणार आहे.
          निःशुल्क प्रशिक्षण घेण्याकरीता उपलब्ध कोर्सेस पुढील प्रमाणे. जिल्हयात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी असिस्टंट ईलेक्ट्रीशियन, ऑटोमोटिव्ह वेल्डींग मशिन असिस्टंट, मल्टीस्कील टेक्नीशियन, मेडीकल सेल्स रिफ्रेंझेंटेटिव्ह, डिटीएच सेट टॉप बॉक्स इंस्टॉलेशन अॅण्ड सर्व्हिस टेक्नीशियन, सेविंग मशिन ऑपरेटर, ब्युटी थेरपिस्ट, टु-व्हिलर सर्व्हिस टेक्निशियन, फ्रेश वाटर अक्वॉकल्चर फार्मर, मशरुम ग्रोवर, ऑरगॅनिक ग्रोवर, आदी कोर्सेस उपलब्ध आहेत.
          इच्छुक युवक-युवतींना खालील लिंकव्दारे गुगल फॉर्ममध्ये पूर्वनोंदणी करता येईल. जिल्हयातील १५ ते ४५ वयोगटातील रोजगार/स्वयंरोजगार इच्छूक युवक-युवतींनी निःशुल्क कौशल्य घेण्यासाठी विकास आपल्या भ्रमणध्वनीवर https://washimskill.blogspot.com/2023/02/blog-post.html या संकेतस्थळावरील गुगल फॉर्ममधील उपलब्ध इच्छुक कोर्सेसमध्ये नांव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, वाशिम कार्यालयातील अतिश घुगे (९८५०९८३३३५), दिपक भोळसे (९७६४७९४०३७) व प्रतिक बाराहाते (९०९६८५५७९८) यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे किंवा प्रत्यक्ष संपर्क करावा. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.