मनरेगातील उत्कृष्ठ कार्यात तिरोडा पंचायत समिती राज्यात प्रथम,मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार

0
61

गोंदिया,दि.08ः- राज्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत उत्कृष्ठ कार्य करीत राज्यात पंचायत समिती गटात तिरोडा पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल राज्यपाल बैस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबई येथील कार्यक्रमात तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतिश लिल्हारे व त्यांच्या चमूचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तिरोडा पंचायत समितीने वर्ष 2020-21 व 22 मध्ये मनरेगा अंतर्गत वैयक्तीक लाभ योजना राबवून अधिकाधिक लोकांना संधी दिल्याबद्दल तसेच व्यक्तीगत लक्ष पुर्ण केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.पुरस्कार तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, सहायक कार्यक्रम अधिकारी सुनिल कटरे, खेमचंद तुरकर, रामदास बावनकर, राजेश मेश्राम आदीनी हा पुरस्कार स्विकारला.