आरोग्य विभागामार्फत महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

0
30

गोंदिया,दि.09ः-  8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागामार्फत जिल्हा परिषदेतील यशवंतराव नाईक सभागृहात महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा आय.ई.सी.अधिकारी प्रशांत खरात, आरोग्य विस्तार अधिकारी अनिता तिरपुडे, अधिपारीचारीका कल्याणी चौधरी आदींची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. नितीन वानखेडे यांनी आरोग्य विभागात विविध पदांवर महिला कार्यरत असून लोकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने पुरुष संवर्गासोबत महिला आरोग्य कर्मचारी सुद्धा उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करत असल्याबाबत त्यांचे कौतुक केले तर डॉ. दिनेश सुतार यांनी जिल्ह्यात महिला पदांवर तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेविका, कनिष्ठ सहाय्यक, स्टाफ नर्स, अंशकालीन स्त्री परिचर, परिचर, आशा गटप्रवर्तक,आशा सेविका, जिल्हास्तरावरील विविध कार्यक्रम समन्वयक, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पदांच्या माध्यमातून लोकांना अविरत आरोग्य सेवा प्रदान करत असून गेल्या पाच महिन्यापासून राज्यात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात गोंदिया जिल्हा प्रथम रँकिंग वर आणण्यात मोलाची कामगिरी केली आहे.
तरी जागतिक महिला दिनी आरोग्य विभागामार्फत महिला दिनाच्या औचित्य साधून महिलांना शुभेच्छा देऊन यापुढेही असेच गुणात्मक सेवा प्रदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. या कार्यक्रम प्रसंगी तालुका आरोग्य सहाय्यक, आरोग्य विस्तार अधिकारी उपस्थित होते.