52 कोटींच्या रस्त्यांचा कामांना मंजुरी आणि अर्थंसंकल्पात 100 कोटींच्या रस्त्यांचे कामांची तरतूद

0
32

आ.विनोद अग्रवाल यांनी शिंदे -फडणवीस सरकाराचे मानले आभार

गोंदिया-क्षेत्रातील नागरिकांचा प्रवास सुकर कसा व्हावा तसेच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या दृष्टीने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची दर्जोन्न्तीकरीता आ.विनोद अग्रवाल यांच्या पाठपुरावामुळे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ५२ कोटी ७९ लक्षच्या कामांची मंजूरी मिळालेली आहे. यात रजेगांव ते कोचेवाही रस्ता करीता ४. कोटी २५ लक्ष, कोरनी ते भादूटोला रस्ता  २ कोटी ८० लक्ष, बिरसी ते परसवाडा रस्ता २ कोटी ३ लक्ष, कुडवा- सूर्याटोला ढाकनी सदर रस्त्यावर स्लैब ड्रेन ६ मीटर २० मी लांबीचे पिचिंग आणि ०.९०० किमी सीमेंट रस्ता करीता २ कोटी ७३ लक्ष, चिरामनटोला ते छिपिया रस्ता करीता ३ कोटी १८ लक्ष, इर्री ते नवरगांव रस्ता ३ कोटी, नवाटोला चांदनीटोला, हल्बीटोला, लोधीटोला, गर्रा, गात्रा, मुरपार बघोली रस्ता करीता ५ कोटी, लहिटोला ते गोंडीटोला रस्ता करीता २ कोटी ७० लक्ष, अदासी पोवारीटोला गोंडीटोला रस्ता करीता २ कोटी १० लक्ष, बघोली ते उमरी रस्ता करीता १ करोड़ ९५ लक्ष, कासा -बिरसोला-सिंगलटोली रस्ता करीता २ करोड़ ५३ लक्ष, आसोली ते नवरगाँवकला रस्ता करीता १ कोटी २ लक्ष, तेढवा ढीमरटोला रस्ता करीता ७४ लक्ष, राष्ट्रीय मार्ग ते धामनगाँव करीता ६७ लक्ष, रायपुर ते बिरसी करीता १ करोड़ २९ लक्ष, अदासी ते दागोटोला रस्ता करीता २ करोड़ ४५ लक्ष, कटंगी ते गोंडीटोला रस्ता करीता २ करोड़ १५ लक्ष, चांदनीटोला नवाटोला घिवारी गिरोला या रस्त्याकरीता ३ कोटी ६७ लक्ष, सालईटोला लोहारा, कन्हारटोला लहीटोला घिवारी रस्त्याकरीता ३ कोटी १५ लक्ष, रावणवाड़ी चारगाव सिरपुर रजेगांव रस्ता करीता २ कोटी २१ लक्ष, निलज दासगाँव रायपुर, निलागोंदी ३ कोटी ४२ लक्ष अश्या प्रकारे एकुण ५२ कोटी ७९ लक्ष च्या कामांना मंजूरी मिळालेली आहे.

               आ.विनोद अग्रवाल यांनी रस्त्यांची दर्जोन्न्ती करीता निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे एवं उप-मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांचे आभार मानले आहे. या रस्त्यांचा काम पूर्ण झाल्यास गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये रस्त्यांचे जाळे व गोंदिया विधानसभा क्षेत्र या एक सुजलाम सुफलाम क्षेत्राकड़े अग्रसर होईल. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवास करण्यास मार्ग सुकर होणार अशी माहिती आ.विनोद अग्रवाल यांनी दिली आहे. तसेच अलीकडेच रावणवाड़ी कामठा आमगांवच्या सर्वेक्षणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. सदर रस्त्यांचे बांधकाम अंदाजित १५० कोटीचे रक्कमातुन होणार आहे.